कॉँग्रेस आहे म्हणून सरकार आहे याचे स्मरण ठेवा… काँग्रेस आमदारांना कमी निधी देत असल्याबद्दल नाना पटोलेंचा इशारा


विशेष प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेसच्या आमदारांना निधी कमी दिला जात आहे. काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे’, याचे स्मरण करून देतानाच काँग्रेसला बेदखल करू नका, असा इशारा कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. Nana patole again warned Pawar Thackeray govt over less fund for Cong MLAs

पटोले म्हणाले, एखादी गोष्ट कमी दिली जात असेल तर त्यावर बोलल्यास ते चूक म्हणता येणार नाही. केवळ समान वाटप व्हावं इतकीच आमची अपेक्षा आहे. काँग्रेस राज्यातील आगामी निवडणुका स्वबळावर लढेल व पुढची सत्ता काँग्रेसची असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.पटोले म्हणाले, आगामी काळात लोकसभा निवडणुका एकत्रितपणे लढवायच्या आहेत. परंतु, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवायच्या असल्याने त्यादृष्टीने आतापासूनच तयारीला लागा. शिवसेनेच्या ताब्यातील महापालिकातीलही भ्रष्टाचा बाहेर काढा . जिथे जिथे पक्ष कमकुवत आहे, त्या ठिकाणी अध्यक्षांनी सर्वांना एकत्र घेऊन पक्षाला बळकटी द्यावी अन्यथा तेथील अध्यक्ष बदलावा लागेल.

Nana patole again warned Pawar Thackeray govt over less fund for Cong MLAs

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी