स्वदेशीला ते जेवढा विरोध करतील, ते तेवढेच उघडे पडतील; स्वदेशी लसीला विरोध करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर नड्डांचा निशाणा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना लसीच्या संशोधनाबाबत भारतीय शास्त्रज्ञांनी कौतूकास्पद यश मिळविले असताना त्यावरून सगळ्याच पक्षांनी राजकारण सुरू केलेय. पण त्यातही काँग्रेसच्या दोन नेत्यांनी स्वदेशी कोव्हॅक्सिनवर आक्षेप नोंदविल्याने त्यांच्यावर सोशल मीडियातून टीकेचा भडिमार होतोय. Nadda hits out at Congress over Covid-19 vaccine ‘doubts’

काँग्रेसचे नेते जेवढा विरोध करतील, तेवढे तेच एक्सपोज होतील, अशा शब्दांमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी जीवापाड मेहनत करून स्वदेशी लस विकसित केली. तिला केंद्र सरकारने सर्व चाचण्या यशस्वी केल्यानंतर परवानगी दिली.जगात अजून कोरोना लसीवर संशोधन सुरू असताना भारतात दोन लसी तयार झाल्या. भारतीयांच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल कौतूक वाटण्याऐवजी काँग्रेसचे नेते स्वदेशी लसीवर शंका काढतात. हे त्यांनाच लांछनास्पद आहे. ते जेवढे विरोध करतील, तेवढे तेच उघडे पडतील, अशा शब्दांमध्ये नड्डांनी शशी थरूर आणि जयराम रमेश या काँग्रेस नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे.

काँग्रेसची ही फिरतरच आहे, की भारताने आणि भारतीयांनी काही उत्तम कामगिरी केली किंवा काही उज्ज्वल यश मिळविले की काँग्रेसचे नेते त्यामध्ये खुसपटे काढतातच. विरोधी पक्ष त्यात राजकारण आणतात. पण आता भारतीय जनता पूर्ण सजग आहे. ती असले प्रकार सहन करणार नाही.

Nadda hits out at Congress over Covid-19 vaccine ‘doubts’

या पक्षांना जनतेने केव्हाच नाकारले आहे. पुढेही नाकारतील, असा इशाराही नड्डांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने कोरोना संकटकाळातही सर्वच क्षेत्रांमध्ये मोठी झेप घेतली. शास्त्रज्ञांचा, डॉक्टरांचा, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचा त्यात सर्वांत मोठा वाटा आहे, अशी कृतज्ञता नड्डांनी व्यक्त केली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*