नेताजींच्या १२५ व्या जयंती कार्यक्रमापासून काँग्रेस संपूर्ण अलिप्त राहिली; राहुल गांधींकडून फक्त १४ शब्दांचे ट्विट!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : महान स्वातंत्र्यसैनिक आणि देशभक्त नेताजी सुभाष चंद्र बोस यांना १२५ व्या जयंतीनिमित्त माझे नमन, एवढे १४ शब्दच काँग्रेस पक्षाचे नेताजींच्या कार्यक्रमात “योगदान” होते. नेताजींच्या १२५ व्या जयंतीच्या अख्ख्या कार्यक्रमापासून काँग्रेस अलिप्त होती. किंबहुना काँग्रेस नेत्यांनी स्वतःला अलिप्त ठेवले होते… काँग्रेस नेते पूर्वी नेताजी जयंतीपासून एवढे अलिप्त राहिल्याचे दिसले नव्हते. My tributes to the great freedom fighter & patriot Netaji Subhas Chandra Bose on his 123rd birth anniversary – Rahul Gandhi
राहुल गांधी काल तामिळनाडूत एका कार्यक्रमात सहभागी झाले. पण तो नेताजींच्या जयंतीचा कार्यक्रम नव्हता. तो काँग्रेस पक्षाचा वेगळा कार्यक्रम होता. बंगालमध्ये खासदार अधीररंजन चौधरी यांनी एका कार्यक्रमात भाग घेतल्याचे दिसले.बाकी छोटे – मोठे कार्यक्रमही झाले असतील – नसतील. पण काँग्रेसचा कोणताही मोठा कार्यक्रम झाल्याचे आढळले नाही. कोलकात्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी रॅली काढली. प्रोटोकॉल म्हणून का होईना… त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. तिथे नाराजीनाट्य देखील रंगले… पण काँग्रेस पक्षाने नेताजींच्या कार्यक्रमापासून स्वतःला पूर्ण अलिप्तच ठेवले. ना कोणी त्यांचे मोठे नेते सहभागी झाले… ना त्यांचे कुठे पक्ष म्हणून कार्यक्रम झालेले दिसले.
पूर्वी, शहराशहरांमधील आणि गावागावांमधील काँग्रेस भवनांमध्ये नेताजी जयंतीचे कार्यक्रम होत असत. अर्थात गांधी – नेहरू आणि इंदिरा गांधी जयंतीचे ग्लॅमर त्याला कधी नव्हते ही वस्तूस्थिती होती. पण कार्यक्रम व्हायचे आणि त्याला काँग्रेसचे स्थानिक नेते, कार्यकर्ते यायचे. काल नेताजींच्या १२५ जयंती कार्यक्रमात याचाच अभाव आढळला. नेताजी जयंतीचे काँग्रेस नेत्या आणि कार्यकर्त्यांमध्ये वारेच शिल्लक राहिले नसल्याचे दिसले.

My tributes to the great freedom fighter & patriot Netaji Subhas Chandra Bose on his 123rd birth anniversary – Rahul Gandhi

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था