व्यवहार माझे, जबाबदार वाझे, सांगा पाहू, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केलीआहे. व्यवहार माझे म्हणजे नक्की कोणाचे याबाबतही त्यांनी सूचक विधान केले आहे.My dealings, responsible Waze, Amrita Fadnavis attack the Thackeray government
विशेष प्रतिनिधी
मुंबई: व्यवहार माझे, जबाबदार वाझे, सांगा पाहू, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केलीआहे. व्यवहार माझे म्हणजे नक्की कोणाचे याबाबतही त्यांनी सूचक विधान केले आहे.
चेल्यांना हाताशी धरून उद्योगपतींना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या योजना असे ट्विट करत अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला होता. एकीकडे नागपूरमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी इस्पितळात जागा उरलेली नाही.
त् दुसरीकडे ठाकरे सरकार कोव्हिड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करत आहे. तसेच आपल्या चेल्यांना हाताशी धरून उद्योगपतींना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या योजना आखल्या जात आहेत, असे त्यांनी म्हटले होते.
आता त्यांनी आपल्या ट्विटमधून थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. सचिन वाझे सुमारे अठरा वर्षे निलंबित होते. उध्दव ठाकरे यांच्या आग्रहामुळे त्यांना पुन्हा पोलीस सेवेत घेण्यात आले. त्यांची गुप्तचर विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती.
त्याचबरोबर सुशांतसिंह राजपूत, दिशा सॅलियन आणि अर्नब गोस्वामी यांंच्या प्रकरणांचा तपासही त्यांच्याकडे देण्यात आला होता. उध्दव ठाकरे यांनी आपली कामे त्यांच्याकडून करून घेतली असाही आरोप होत आहे. हाच धागा पकडून अमृता फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. व्यवहार माझे म्हणजे उध्दव ठाकरे असे बिटविन द लाईन असल्याचे मानले जात आहे.