हिंदुविरोधी अजेंडा चालविणाऱ्या ममतांना मुस्लिमांचाही विरोध, फुरफुरा शरीफ दर्ग्याचे संस्थापक काढला नवा पक्ष


पश्चिम बंगालमधील ३१ टक्के मुस्लिम मतपेढीवर डोळा ठेऊन हिंदुविरोधी अजेंडा चालविणाऱ्या ममता बॅनर्जींवर आता मुस्लिमांचाही विश्वास राहिला नाही. त्यामुळे फुरफुरा शरीफ दर्ग्याचे संस्थापक पीरजादा अब्बास सिद्दीकी यांनी नव्या पक्षाची स्थापना केली आहे. इंडियन सेक्युलर फ्रंट असं सिद्दीकी यांच्या नव्या पक्षाचे नाव आहे. अब्बास सिद्दीकी म्हणाले की, ममता बॅनर्जी नेहमीच आश्वासने देतात परंतु पूर्ण करत नाहीत. Muslims also oppose Mamata who runs anti-Hindu agenda, new party to form founder of Furfura Sharif Dargah


वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगालमधील ३१ टक्के मुस्लिम मतपेढीवर डोळा ठेऊन हिंदूविरोधी अजेंडा चालविणाऱ्या ममता बॅनर्जींवर आता मुस्लिमांचाही विश्वास राहिला नाही. त्यामुळे फुरफुरा शरीफ दर्ग्याचे संस्थापक पीरजादा अब्बास सिद्दीकी यांनी नव्या पक्षाची स्थापना केली आहे. इंडियन सेक्युलर फ्रंट असं सिद्दीकी यांच्या नव्या पक्षाचे नाव आहे. अब्बास सिद्दीकी यांनी ममता बॅनर्जींवर खोटारडेपणाचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, ममता बॅनर्जी नेहमीच खोटी आश्वासने देतात. एकही आश्वासन त्या पूर्ण करत नाहीत.

सिद्दीकी यांनी सिंगूर आणि नंदीग्राम आंदोलनात महत्वाची भूमिका बजावली होती. नंदीग्राममध्ये सुवेंद्र अधिकारी यांच्यानंतर ममता बॅनर्जी यांना आणखी एक धक्का बसला आहे. पीरजादा अब्बास सिद्दीकी यांनी पत्रकार परिषद घेऊन इंडियन सेक्युलर फ्रंटची स्थापना केली आहे. हा पक्ष राज्यात 294 जागा लढवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.सिद्दीकी हे ममता बॅनर्जी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. सिंगूर आणि नंदीग्राम आंदोलनातही त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे. पक्ष स्थापन करण्यापूर्वी सिद्दीकी यांनी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांची भेट घेतली होती. गेल्या काही महिन्यांपासून सिद्दीकी यांचं ममता बॅनर्जी यांच्याशी बिनसल्याने त्यांनी ममता सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच त्यांनी नवा पक्ष स्थापन करून ममता बॅनर्जींना मोठा झटका दिला आहे.

पश्चिम बंगालमध्ये 31 टक्के मुस्लिम मतदार आहेत. हा मुस्लिम मतदार टीएमसी आणि डाव्यांचा जनाधार आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये एमआयएमसह सिद्दीकी यांच्या पक्षानेही उडी घेतल्याने मुस्लिम मतांची विभागणी होऊन त्याचा भाजपलाच फायदा होणार असल्याचं राजकीय निरीक्षकांनी सांगितलं.
ममता बॅनर्जी यांनी मुस्लिमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करून सिद्दीकी यांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालच्या सुमारे 100 मतदारसंघात सिद्दीकी यांचा प्रभाव आहे. आता तेच निवडणूक मैदानात उतरल्याने ममता बॅनर्जींना किमान 40 ते 60 ठिकाणी नुकसान होऊ शकते.

आत्तापर्यंत मुस्लीम धर्मगुरु म्हणून ओळखले जाणारे पीर अब्बास सिद्दीकी या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय नेते म्हणून समोर येत आहेत. सिद्दीकी यांची दलित, मटुआ आणि मुस्लीम समुदायात चांगली पकड आहे. इथे ते ‘भाईजान’ नावानं ओळखले जातात. अब्बास सिद्दीकी यांच्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या मुस्लीम वोटबँकेला धक्का बसू शकतो. बंगालमध्ये गेल्या १० वर्षांपासून मुस्लीम वोटबँकेचा तृणमूल काँग्रेसला फायदा झाला होता.

Muslims also oppose Mamata who runs anti-Hindu agenda, new party to form founder of Furfura Sharif Dargah

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी