माणिपूरच्या इंफाळमध्ये साकारले आझाद हिंद सेनेवर संग्रहालय

दुसरे महायुद्ध आणि मणिपूर यांचे दृढ नाते आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने माणिपूरमार्गे दिल्ली जिंकण्याचा निर्धार केला होता. आता दुसरे महायुद्ध इंफाळ कॅम्पेन फाउंडेशनने इंफाळमध्ये आझाद हिंद सेनेवर एक संग्रहालय उभारले आहे. Museum on Azad Hind Sena Built In Imphal, Manipur


विशेष प्रतिनिधी

मणिपूर : दुसरे महायुद्ध आणि मणिपूर यांचे दृढ नाते आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने माणिपूरमार्गे दिल्ली जिंकण्याचा निर्धार केला होता. आता दुसरे महायुद्ध इंफाळ कॅम्पेन फाउंडेशनने इंफाळमध्ये आझाद हिंद सेनेवर एक संग्रहालय उभारले आहे.नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने मणिपूरमधील इंफाळ आणि नागालँड येथील कोहिमा ताब्यात घेऊनन दिल्ली चलोचा नारा दिला होता. हजारो सैनिकांनी देशासाठी बलिदान दिले होते. त्यामुळे मणिपूरच्या पर्यटन विभागाच्या पुढाकाराने हे संग्रहालय उभारण्यात आले. मणिपूर हे ऐतिहासिक माहितीचे भांडार आहे. कारण ते दुसरे महायुद्धातील महत्त्वपूर्ण साक्षीदारापैकी एक मानले जाते.

दुसर्‍या महायुद्धातील दुर्मिळ अरिसाका तोफा व बुलेटचे बॅरल, डकोटा विमानाचा एक रेडिओ कंपास, तोफखाना, शेल, खाकी शर्ट, युद्ध हस्तपुस्तिका, जपानी ग्रेनेड आणि पायलटांकडून वापरल्या जाणार्‍या ऑक्सिजन सिलेंडर्सचा समावेश आहे.

Museum on Azad Hind Sena Built In Imphal, Manipur

“आम्ही जवळपास 16 रणांगण साइट शोधून काढली आहेत आणि अजून संशोधनांची गरज आहे. पर्यटकांना आकर्षित करणारे आकर्षण केंद्र आम्ही ओळखले आहेत,” असे फाऊंडेशनतर्फे सांगण्यात आले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*