मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन झाली, नवनियुक्त मुंबई आयुक्त हेमंत नगराळे यांचीच कबुली


एकेकाळी स्कॉटलंड यार्डशी तुलना होणाऱ्या मुंबई पोलिसांची प्रतिमा ठाकरे सरकारने मलिन केली. खुद्द मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त नगराळे यांनी ही कबुली दिली आहे.


वृत्तसंस्था

मुंबई : एकेकाळी स्कॉटलंड यार्डशी तुलना होणाऱ्या मुंबई पोलिसांची प्रतिमा ठाकरे सरकारने मलिन केली. खुद्द मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त नगराळे यांनी ही कबुली दिली आहे.
आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास असमर्थता दर्शविली. ते म्हणाले, मुंबई पोलिसांसाठी सध्या कठीण काळ सुरू आहे. Mumbai police image malinated, Police commissioner Nagrale accepted in press conference

या कठीण काळात राज्य सरकारने माझ्यावर एक जबाबदारी सोपवली आहे. मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे, ती सुधारण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. या सुधारणेमध्ये मला कॉन्स्टेबल ते आयुक्तांपर्यंत साऱ्यांचं सहकार्य हवं आहे. त्याचसोबत सर्व जनतेनेही आम्हाला सहकार्य करावं, अशी माझी विनंती आहे. महाराष्ट्र व मुंबई पोलिसांवर कोणतीही टीका होणार नाही, यासाठी साऱ्यांच्या सहकार्याने आम्हाला पोलीस दलांत आवश्यक त्या सुधारणा करायच्या आहेत.

पत्रकार परिषदेत पत्रकारांना विनंती करण्याची वेळ नगराळे यांच्यावर आली. ते म्हणाले, सर्व पत्रकारांना मी विनंती करतो की सध्या राज्यात काही प्रकरणांचा तपास सुरू आहे. जेव्हा प्रकरण तपासाच्या प्रक्रियेत असते, त्यावेळी त्यावर बोलणं योग्य नाही. त्यामुळे अशा प्रश्नावर मी भाष्य करून घेणार नाही. तसेच, सचिन वाझे यांच्या प्रकरणात काय काय होऊ शकते? याबद्दलचे अतिशयोक्ती होणारे प्रश्न किंवा जर-तर, किंतु-परंतु करणारे प्रश्न विचारू नयेत. कारण मी नुकताच पदभार स्वीकारला आहे. मी मुंबई आयुक्तालयात आधीही काम केलं आहे. पण सध्याच्या गोष्टींबद्दल मी प्रश्नांची उत्तरं आत्ताच देऊ शकणार नाही.”

ठाकरे सरकारचा निकटवर्तीय मानला जाणारा सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. वाझे यांचे खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत आणि नंतर पत्रकार परिषदेत समर्थन केले होते. मात्र भारतीय जनता पक्षाने आक्रमकपणे भूमिका मांडल्याने सरकारला माघार घ्यावी लागली. राज्य सरकारने पोलीस दलात महत्त्वपूर्ण फेरबदल करत परमबीर सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरून दूर केलं. रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार, संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी तर परमवीर सिंग यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी दिली. आयुक्तांची बदली करण्याची नामुष्की सरकारवर आल्याने मुंबई पोलीस दलात अस्वस्थता पसरली आहे.

Mumbai police image malinated, Police commissioner Nagrale accepted in press conference

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था