मुंबई पोलीसांचा दावा केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांनी ठरविला खोटा, संवेदनशील विषयांवर व्हॉटसअ‍ॅप चॅट नाही

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्यासह इतर गोपनीय आणि संवेदनशील विषयांसंबंधी व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक झालेले नाही असे केंद्रीय गृह राज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे.Mumbai Police claims ruled out by Union Home Minister for sate


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्यासह इतर गोपनीय आणि संवेदनशील विषयांसंबंधी व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक झालेले नाही असे केंद्रीय गृह राज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे.

टीआरपी दुरुपयोग प्रकरणी मुंबई पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या ५०० पानांच्या आरोपपत्रात व्हॉट्सअ‍ॅप चॅटींगाची माहिती देण्यात आली होती. यात बालाकोट हल्ला आणि कलम ३७० हटवण्याच्या मुद्यावर कथित चर्चा झाली.यावर सरकारला अशी कुठलीही बाब आढळून आलेली नाही, असे जी किशन रेड्डी यांनी एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे. गोपनीय आणि संवेदनशील माहिती व्हॉट्सअ‍ॅप चॅटवर लीक झाल्याप्रकरणी सरकारकडे काय माहिती आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

बालाकोट हवाई हल्ल्याची माहिती व्हॉट्सअ‍ॅप चॅटवर आधीच लीक झाल्याच्या आरोप करत काँग्रेससह विरोधी पक्षांनी संबंधीतांवर कारवाईची मागणी केली होती. संवेदनशील आणि सैन्य कारवाईची माहिती उघड करणं हे गोपनीय कायद्यांतर्गत गुन्हा आहे. एवढचं नव्हे तर हा देशद्रोह आहे, असं माजी संरक्षणमंत्री ए. के. एन्टनी म्हणाले होते.

Mumbai Police claims ruled out by Union Home Minister for sate

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*