मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळेही वादग्रस्तच, पत्नीनेच केला होता बेनामी व्यवहारांचा आरोप

अंबानी स्फोटक प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांची उचलबांगडी करण्याची वेळ ठाकरे सरकारवर आली. त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची कारकिर्दही वादग्रस्त राहिली आहे. आपल्या नावावर बॅँक अकाऊंट सुरू करून त्यावरून बेनामी व्यवहार नगराळे यांनी केले होते असा आरोप त्यांच्या पत्नी प्रतिमा नगराळे यांनी केला होता. Mumbai new police commissioner Hemant Nagarale was also controversial his wife alleging anonymous transactions


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अंबानी स्फोटक प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांची उचलबांगडी करण्याची वेळ ठाकरे सरकारवर आली. त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची कारकिर्दही वादग्रस्त राहिली आहे. आपल्या नावावर बॅँक अकाऊंट सुरू करून त्यावरून बेनामी व्यवहार नगराळे यांनी केले होते असा आरोप त्यांच्या पत्नी प्रतिमा नगराळे यांनी केला होता.

प्रतिमा नगराळे यांनी मार्च २००८ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता. प्रतिमा यांनी आरोप केला होता की नगराळे यांनी बळजबरीने त्यांना घराबाहेर काढले. पुन्हा घरात प्रवेश केल्यास वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करण्याची धमकी दिली होती.’घटस्फोटासाठी आपला शारीरिक छळ करत होते. त्यासाठीच ते आपल्याला वेडे ठरविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर आपल्या नावावर बॅँकेत खाते उघडून त्यावर नगराळे यांनी बेनामी व्यवहार केले. ता. २००९मध्ये या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयासमोर सुनावणी देखील झाली होती. यो डिसेंबर २०१०मध्ये झालेल्या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने हे आरोप फेटाळून लावले होते.

त्याचबरोबर हेमंत नगराळे यांचे २०१८ साली हेमंत नगराळे यांचं निलंबन करण्यात आले होते. कारण शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात नगराळे यांनी गुन्हा दाखल केला होता. विधान परिषदेच्या आमदारावर सभापती यांच्या परवानगीशिवाय हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा बेकायदेशीर निर्णय घेतल्याने उपायुक्त तुषार दोषी आणि हेमंत नगराळे यांना निलंबित करण्याचे आदेश सभापती रामराज नाईक-निंबाळकर यांनी दिले होते.

पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात हेमंत नगराळे यांची तक्रार मुख्यमंत्र्यांपर्यंत करण्यात आली होती. तसेच एका बांधकाम व्यावसायिकाचे संरक्षण काढून घेण्यात आले होते, या न्यायालयाने नगराळेंवर ताशेरे ओढले होते.

हेमंत नगराळे हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रवतीचे आहेत. १९८७च्या बॅचचे ते पोलीस अधिकारी आहेत. १९९८ ते २००२ या चार वर्षांच्या काळात नगराळे यांनी आधी सीबीआयचे एसपी आणि नंतर डीआयजी म्हणून काम पाहिलं आहे. याच काळात त्यांनी १३० कोटींचा आर्थिक घोटाळा झालेले प्रसिद्ध केतन पारेख प्रकरण, शेअर बाजारातील विख्यात घोटाळा ठरलेल्या ४०० कोटींच्या हर्षद मेहता घोटाळा आणि तब्बल १८०० कोटींच्या माधोपुरा कोआॅपरेटिव्ह बँक घोटाळ्याचा तपास केला आहे.

२००८मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्यावेळी हेमंत नगराळे स्पेशल इन्स्पेक्टर जनरल होते. त्यावेळी नगराळे हॉटेल ताजमध्ये शिरले आणि त्यांनी जखमी आणि मृतांना बाहेर काढण्याची जबाबदारी पार पाडली. तसेच, यानंतर नगराळे यांनी ताजमध्ये ठेवण्यात आलेली स्फोटकाने भरलेली बॅक स्वत: बाहेर काढून सुरक्षित स्थळी ठेवली आणि नंतर बॉम्ब स्क्वॉडला पाचारण केले.
हेमंत नगराळे यांनी याआधी २०१४मध्ये काही काळासाठी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला आहे. २०१६ ते २०१८ या कालावधीमध्ये ते नवी मुंबईचे पोलीस आयुक्त देखील राहिले आहेत. नुकतीच ७ जानेवारी २०२१ रोजी हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली होती.

Mumbai new police commissioner Hemant Nagarale was also controversial his wife alleging anonymous transactions

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*