कोरोनाच्या औषध खरेदीतही मुंबई महापालिकेत घोटाळा, आशिष शेलार यांची न्यायालयात याचिका


मुंबई महापालिकेत कोरोनाच्या औषध खरेदीतही आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. रुग्णालयांना पुरविण्यात येणाऱ्या औषध आणि जंतुनाशकाच्या खरेदी प्रक्रियेत आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करणारी जनहित याचिका शेलार यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. Mumbai Municipal Corporation scam in procurement of Corona drugs


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महापालिकेत कोरोनाच्या औषध खरेदीतही आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. रुग्णालयांना पुरविण्यात येणाऱ्या औषध आणि जंतुनाशकाच्या खरेदी प्रक्रियेत आर्थिक घोटाळा करण्यात आल्याचा आरोप करणारी जनहित याचिका शेलार यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.Mumbai Municipal Corporation scam in procurement of Corona drugs

त्याची दखल घेत न्यायालयाने पालिका प्रशासन आणि राज्य सरकारला दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषधं आणि जंतुनाशक खरेदी करण्यासाठी पालिका प्रशासनाने 21 ऑगस्ट 2020 रोजी निविदा प्रक्रिया राबविली होती. ही निविदा प्रक्रिया जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्रीय आरोग्य यंत्रणेच्या अटींशी सुसंगत नसल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे.

या याचिकेवर शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली. निविदाधारकांच्या हितासाठीच या निविदेत नमूद केलेल्या वस्तूंच्या गुणवत्ता मानकांशी तडजोड करण्यात आली आहे. कमी दर्जाची औषधे आणि या जंतुनाशकांच्या वापरामुळेच मनपा रुग्णालयातील कर्मचारी आणि दाखल होणारे रुग्ण यांच्यात कोरोना संक्रमणाचे प्रमाण वाढल्याचा आरोपही या याचिकेतून करण्यात आला आहे.

यासंदर्भात सुरू असलेल्या निविदा प्रक्रियेला तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे. या प्रक्रियेमुळे सर्वसमान्यांच्या आरोग्यावर तसेच त्यांच्या सुरक्षिततेवरही थेट परिणाम होत आहे. त्यामुळे पारदर्शक आणि योग्य पद्धतीने नियमित प्रक्रिया राबवून उत्तम औषधं आणि जंतुनाशकं खरेदी करण्याकडे भर द्यावा असे निर्देश देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

Mumbai Municipal Corporation scam in procurement of Corona drugs

त्यामुळे 21 ऑगस्ट 2020 रोजी महानगरपालिकेने काढलेल्या निविदा प्रक्रियेवर स्थगिती देण्यात यावी आणि भविष्यात औषधे, जंतुनाशक आणि इतर वैद्यकीय उपकरणांसह सर्व वैद्यकीय साहित्यांची खरेदी करण्यासाठी केंद्रीय दक्षता समितीच्या (सीव्हीसी) मार्गदर्शक तत्त्वांचे आणि अटींचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश पालिका आणि राज्य सरकारला देण्यात यावेत, अशी विनंतीही याचिकेतून करण्यात आली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती