मुंबई लोकल सुरु करण्याबाबत ठाकरे – पवार सरकारकडून प्रस्तावच नाही

  • रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची माहिती

वृत्तसंस्था  

मुंबई : मुंबई लोकल सुरु करण्याबाबत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी एक मोठा खुलासा केला आहे. ठाकरे – पवार महाराष्ट्र सरकारकडून रेल्वे मंत्रालयाला रेल्वे सुरू करण्याबाबत अजून कोणतीही मागणी अथवा प्रस्ताव आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकल कधी सुरू होईल याबाबत अस्पष्टता निर्माण झाली आहे.

सरकारने मात्र अनलॉक प्रक्रिया सुरू करायच्या भरपूर बाता केल्य आहेत. परंतु, प्रत्यक्ष कार्यवाही झालेली दिसत नाही.

अनलॉकच्या सुरू झालेल्या टप्प्यांमध्ये मुंबईतील लोकल सुरू करण्याबाबत अजून तरी कोणतीही मागणी महाराष्ट्र सरकारकडून मला प्राप्त झालेली नाही. मागणीनंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल, असे पीयूष गोयल म्हणालेत.

राज्य सरकार जोपर्यंत प्रस्ताव पाठवत नाही, तोपर्यंत आम्ही निर्णय घेऊ शकत नसल्याचे रेल्वे मंत्रालयाने याआधीच स्पष्ट केले असल्यामुळे मुंबई लोकल १५ तारखेपर्यंत सुरू करू, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले असले तरी त्यासाठी राज्य सरकार रेल्वे मंत्रालयाला कधी प्रस्ताव पाठवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*