बंगालमध्ये लोकल सुरू झाल्याची नुसतीच ओरड, पण महाराष्ट्रात लोकल सुरू करण्याचा राज्य सरकारच्या पत्रात उल्लेखच नव्हता

  • मध्य रेल्वेच्या खुलाशातून ठाकरे – पवार सरकारचा दुटप्पीपणा उघड,
  • राज्य सरकारने मिटींग घेण्याची रेल्वे प्रशासनाची मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : बंगालमध्ये लोकल सुरू झाली. पण मुंबई, महाराष्ट्रात अद्याप लोकल सेवा सुरू झालेली नाही. अशी ओरड करण्यात आली. Mumbai local महिलांसाठी लोकल सुरु केल्यानंतर सर्वसामान्यांसाठी देखील सुरु करावी अशी मागणी राज्य सरकारने केल्याचे सांगण्यात येत होते. पण अशी मागणीच झाली नसल्याचा दावा मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी केला असून चेंडू पु न्हा राज्य सरकारच्या कोर्टात गेला आहे. Mumbai local

२८ तारखेला ठाकरे – पवार राज्य सरकारने रेल्वेला जे पत्र पाठवले त्यात फक्त लोकल सुरू करण्यासंदर्भात माहिती मागवली होती. पण लोकल सुरु करा, असा कुठेही उल्लेख नव्हता असे रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ठाकरे – पवार सरकारची दुटप्पी भूमिका उघड झाली आहे. झी २४ तासने ही बातमी दिली आहे.

राज्य सरकारच्या मागणीनुसार आम्ही जी माहिती द्यायची होती ती सर्व दिली आहे. आम्हाला सर्व सामान्यांसाठी लोकल सुरु करण्यात अडचण नसल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले. आहे. आम्हाला राज्य सरकार सोबत बैठक हवी आहे. ती मात्र बैठक राज्य सरकार कडून घेतली जात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Mumbai local

रेल्वेने जवळपास सर्व सर्व्हिस सुरू केल्या आहेत. कोरोना काळात आम्ही राज्य सरकारच्या सुचनेनुसार या पूर्वी विविध गटातील प्रवाशांना प्रवासाची परवानगी दिली आहे. आम्ही राज्य सरकारच्या प्रतिसादाची आणि स्पष्ट निर्देशाची वाट पाहत आहोत, असे रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*