‘हा भारताचा आत्मा आहे. मी प्रार्थना करतो की आपल्यापासून ही गोष्ट कधीही दुरावणार नाही’, अशा शब्दात आनंद महिंद्रा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना संकटानंतर सर्वसामान्य मुंबईकरांसाठी मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल 1 फेब्रुवारीपासून सुरु करण्यात आली आहे.
लोकल म्हणजे मुंबईची लाइफ लाईन… खूप दिवसांनी लोकल प्रवासाचा योग आलेल्या एका युवकाने लोकलच्या दारावर आपला माथा टेकवला.Mumbai Local is the soul of India; Anand Mahindra is also emotional after seeing the ‘he’ photo
हा फोटो आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही हा फोटो ट्वीट केला.
‘हा भारताचा आत्मा आहे. मी प्रार्थना करतो की आपल्यापासून ही गोष्ट कधीही दुरावणार नाही’, अशा शब्दात आनंद महिंद्रा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली नव्हती. आता 1 फेब्रुवारीपासून राज्य सरकारने सर्वांनाच प्रवासाची मुभा दिली आहे. सरकारने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे मुंबईकर प्रवास करत आहेत. अशावेळी व्हायरल होणारा हा फोटो पाहून सर्वसामान्य मुंबईकर चांगलाच भावूक झालेला दिसत आहे. आनंद महिंद्रा यांनीही ट्विटरवर भावनिक पोस्ट केली आहे.
लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे हा फोटो पाहून कुणीही मुंबईकर भावूक झाल्याशिवाय राहणार नाही. लोकच्या माध्यमातूनच प्रवास करुन सामान्य मुंबईकर आपल्या कामाचं ठिकाण गाठत असतो. पण कोरोनामुळे अनेकांचा रोजगारच हिरावला गेला आहे.
Mumbai Local is the soul of India; Anand Mahindra is also emotional after seeing the ‘he’ photo
एका ट्विटर युजरने लिहिलं आहे की, ‘एक क्लिक ज्याने माझं मन जिंकलं. 11 महिन्यानंतर लोकल प्रवास करण्यापूर्वी एक व्यक्ती लोकलची पूजा करत आहे’.
आनंद महिंद्रा यांनी याला रिट्वीट करत, हा भारताचा आत्मा आहे. मी प्रार्थना करतो की आपल्यापासून ही गोष्ट कधीही दुरावणार नाही’, असं लिहिलं आहे.