वृत्तसंस्था
मुंबई : महावितरणलाच झटका देण्यासाठी भाजप सज्ज झाला आहे. वीज बिल भरले नाही म्हणून कनेक्शन कापण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. त्या विरोधात भाजपतर्फे राज्यव्यापी आंदोलन शुक्रवारी (ता. 5) करण्यात येणार आहे.MSEDCL protest against power cut Statewide agitation tomorrow
महावितरणने 75 लाख ग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवली असून 4 कोटी लोकांना अंधारात ढकलण्याचा पवित्र घेतला आहे. त्याविरोधात भाजपने राज्यभर मंडलस्तवरील महावितरण कार्यालयांना टाळे ठोको,
हल्लाबोल आंदोलन सकाळी 11 वाजता करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात भाजपच्या सर्व आघाडीचे अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख, पदाधिकारी, बूथ, लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यानी सहभागी, असे आवाहन भाजपने करण्यात आले आहे.