भारत वर्णद्वेष कदापी सहन करणार नाही, रश्मी सामंत राजीनामा प्रकरणी जयशंकर यांची स्पष्ट भूमीका

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या पहिल्या भारतीय अध्यक्षा रश्मीy सामंत यांच्यावरील वर्णद्वेषाचा झालेल्या आरोपाबाबत भारत सरकार बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. Mr. S. Jayshanakar react on racism

वर्णद्वेष कदापि सहन केला जाणार नाही. ब्रिटनमध्ये मोठ्या संख्येने भारतीय नागरिक राहत असून उभय देशातील संबंध अधिक दृढ आहेत. गरज भासल्यास ब्रिटन सरकारसमोर मुद्दा मांडला जाईल, असे जयशंकर म्हणाले.
भाजपच्या खासदार अश्विदनी वैष्णव यांच्या प्रश्नांला उत्तर देताना जयशंकर बोलत होते. वैष्णव म्हणाल्या की, ऑक्सफर्ड विद्यापीठात रश्‍मी सामंत यांच्यासमवेत झाले ते चुकीचे झाले.दरम्यान, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या पहिल्या भारतीय अध्यक्षा रश्मी् सामंत यांना वर्णद्वेषाचा आरोप होऊ लागल्याने पदाचा राजीनामा द्यावा लागला. रश्मीय या अध्यक्ष झाल्यानंतर त्यांची एक जुनी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या पोस्टचा आधार घेत रश्मीत यांना वर्णद्वेषी आणि असंवेदनशील असल्याचे म्हटले होते. त्यामुळे दबाव वाढल्याने त्यांना पद सोडावे लागले.

कर्नाटकच्या उड्डपी येथील रहिवासी असलेल्या रश्मी यांनी राजीनाम्यानंतर मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी आपले बहुतांश सोशल मीडिया खातेही बंद केले.

Mr. S. Jayshanakar react on racism

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*