एमपीएससी परीक्षा, मुलाखती, निकालाचे प्रश्न मार्गी लावा; स्टुडंट्स राईट्स असोसिएशनची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, मुलाखत, निकाल अशा अनेक समस्यांना उमेदवारांना सामोरे जावे लागत आहे. त्या बाबत स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.MPSC Exam, Interviews, Result Questions Demand of Students Rights Association through a statement to the Chief Minister

उमेदवारांना न्याय मिळावा याबाबत जिल्हाधिकारी नागपूर यांच्या मार्फत हे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे उमेश कोर्राम, रणजित थिपे, निकेश पिने, पंकज सावरबांधे उपस्थित होते१४ मार्च २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलली आणि ती आता २१ तारखेला घेण्यात येणार आहे. परंतु यामुळे उमेदवारांना शारीरिक, मानसिक व आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.

अनेक उमेदवार प्रवास करीत असताना असा निर्णय घेण्यात आला, तसेच प्रवासाचे रिझर्वेशन आता रद्द करून नवीन तिकिटे घ्यावी लागणार आहे. भविष्यात असे निर्णय घेताना विद्यार्थी हिताचा विचार करावा.

अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे २ उमेदवारांना प्राण गमवावे लागले आहे. या उमेदवारांच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि कुटुंबातील सदस्याला नोकरी द्यावी, तसेच दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे.

२०१८ ते २०१९ वर्षीच्या ४२० उत्तीर्ण उमेदवारांची जिल्हाधिकारी, उपअधीक्षक, तहसीलदार इत्यादी प्रमुख पदांवर तत्काळ नियुक्ती करावी.

जुलै २०२० मध्ये ३६०० इंजिनियर्स उमेदवारांनी MPSC मेन्स परीक्षा उत्तीर्ण केली होती, तरीही अद्याप त्यांची मुलाखत घेतली नसून उमेदवार मुलाखतीची वाट पाहत आहे. त्वरित मुलाखत घेण्यात यावी.

१ वर्षापासून असिस्टंट कन्झर्व्हेटर फॉरेस्ट (ACF) या पदांसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल प्रलंबित आहेत. तरी तत्काळ निकालाची घोषणा करावी. १५ मार्च २०२० रोजी आरटीओ पदासाठी पूर्वपरीक्षा घेण्यात आली. अद्याप निकाल जाहीर झाला नाही. तत्काळ निकालाची घोषणा करावी.

तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या नियमानुसार ६ असायला पाहिजे. परंतु मागील ३ वर्षापासून केवळ दोनच सदस्यांवर पूर्ण भार आहे. तरीही त्वरित उर्वरित ४ सदस्यांची आयोगावर नियुक्ती करण्यात यावी.

MPSC Exam, Interviews, Result Questions Demand of Students Rights Association through a statement to the Chief Minister

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*