ग्रेटा थनबर्गचे शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट षडयंत्र, खासदार मीनाक्षी लेखी यांचा आरोप

स्वीडनमधील किशोरवयीन पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने शेतकरी आंदोलनाबद्दल केलेलं ट्विट एक ‘षडयंत्र’ असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी केला आहे.MP Meenakshi Lekhi accused of tweet conspiracy against Greta Thunberg farmers movement


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : स्वीडनमधील किशोरववयीन पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने शेतकरी आंदोलनाबद्दल केलेलं ट्विट एक ‘षडयंत्र’ असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी केला आहे.

१८ वर्षीय ग्रेटा थनबर्गनं नुकतेच भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आम्ही समर्थन देत आहोत असं ट्विट केलं होतं. त्यानंतर ख्यातनाम पॉप गायिका रिहाना हिनेदेखील या मुद्यावर एक ट्विट करत भारतातील शेतकरी आंदोलकांना पाठिंबा जाहीर केला होता.बुधवारी सोशल मीडियातील आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटलेल्या प्रतिक्रियांवर बोलताना भाजप नेत्या मीनाक्षी लेखी यांनी ग्रेटाचं ट्विट हे ‘षडयंत्र’ असल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, ग्रेटा थनबर्गच्या ट्विटमुळे ज्या षडयंत्राचा आम्हाला अगोदरपासूनच अंदाज होता त्याचा पुरावाच समोर आला आहे. कशा पद्धतीनं हे षडयंत्र रचलं जातंय ते समोर आले आहे.

आंतरराष्ट्रीय पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिने शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट केलं होतं, त्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाच्या ट्विटनंतर ग्रेट थनबर्गने भारतातील शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे ट्विट केले होते. यानंतर देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. देशात दोन गट पडल्याचे चित्र आहे. बॉलिवूडसह क्रिकेट जगतातील अनेकांनी भारतातील आंदोलनाबद्दल ट्विट करणाऱ्या परदेशी सेलिब्रिटींविरोधात जाहीर भूमिका घेतली आहे.

MP Meenakshi Lekhi accused of tweet conspiracy against Greta Thunberg farmers movement

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*