राम मंदिर निधी संकलन मोहिमेला मुंबई महापालिका आणि पोलीसांचा खोडा, बॅनरवर कारवाईची खासदार गोपाळ शेट्टी यांची तक्रार


राम मंदिर निधी संकलनासाठी संपूर्ण देशात मोहिम सुरू आहे. मात्र, या निधी संकलनात मुंबई महापालिका खोडा घालत आहे. निधी संकलनाच्या बॅनरवर कारवाई केली जात असल्याचा आरोप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केला आहे. मुंबई पोलीस बॅनर फाडत असल्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. MP Gopal Shetty’s complaint against Mumbai Municipal Corporation and police for defrauding Ram Mandir fund raising campaign


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राम मंदिर निधी संकलनासाठी संपूर्ण देशात मोहिम सुरू आहे. मात्र, या निधी संकलनात मुंबई महापालिका खोडा घालत आहे. निधी संकलनाच्या बॅनरवर कारवाई केली जात असल्याचा आरोप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केला आहे.

राम मंदिर उभारण्याच्या कार्यासाठी मुंबईतून भाजपा कार्यकर्ते ठिकठिकाणी देणगी गोळा करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करत आहेत. मात्र मुंबई महानगर पालिका व पोलिस राम मंदिर निधी संकलनाचे बॅनर काढत असल्याबद्दल उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.शिवसेनाप्रमुखांना राम मंदिराबद्धल विशेष आस्था होती. देशात राम मंदिर निर्माण कार्याला काँग्रेस व अन्य पक्षांकडून विरोध होत असताना शिवसेनाप्रमुख व संघ परिवार भाजपाच्या मागे खंबीरपणे उभा होता याची आठवण देखील खासदार शेट्टी यांनी आपल्या पत्राद्वारे करून दिली आहे.

आपल्या सर्वांसमोर देशातील नव्हे तर जगातील सर्वोत्तम राम मंदिराचे नवनिर्माण होणार ही अभिमानाची बाब आहे. मात्र मुंबई शहरातील काही भागात राम मंदिर अभियानाचे बॅनर पालिका व पोलिसांकडून काढण्यात येत असल्याने राम भक्तांच्या भावना दुखावल्या जात आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांना आपण योग्य त्या सूचना द्याव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे.मुंबईच्या मुस्लिम बहुल मालवणीसारख्या परिसरात निधी संकलनासाठी लावण्यात आलेले श्रीरामांचे पोस्टरही मुंबई पोलीसांनी फाडले. याविरोधात भाजपाने आंदोलनही केले. मालवणी हा संवेदनशील परिसर असल्याने पोस्टर काढून टाकल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे. मात्र, मुस्लिम बहुल परिसरात कायदा चालत नाही का? असा सवाल भाजपा कार्यकर्त्यांनी केला.

MP Gopal Shetty’s complaint against Mumbai Municipal Corporation and police for defrauding Ram Mandir fund raising campaign

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती