केरळ मध्ये बलात्कार पिडीत मृत मुलींना न्याय देण्यासाठी आई थेट निवडणूक रिंगणात : मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या विरुद्ध अपक्ष उमेदवारी


  • सध्या केरळसह देशातील 5 राज्यांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यातच एक आई आपल्या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी थेट निवडणूक लढवणार आहे.Mother of rape victim girls announce about contesting assembly election against CM P Vijayan in Keral
  • पलक्कड जिल्ह्यातील वालयारमध्ये 13 जानेवारी 2017 ला 13 वर्षांची मुलगी फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यानंतर 4 मार्चला तिची 9 वर्षांची लहान बहिणही अशाच प्रकारे मृत अवस्थेत आढळली होती.अजुनही न्याय न मिळाल्याने आई रणांगणात.राज्य सरकार आणि पिडीत मुलींच्या आईने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने 6 जानेवारीला हा खटला पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले होते.

विशेष प्रतिनिधी

त्रिशूर:केरळसह देशातील 5 राज्यांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे.त्यातच आता एका आईने मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी थेट निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. वालायार येथील दोन अल्पवयीन बहीणींचा बलात्कार आणि नंतर हत्या करण्यात आली या 2 मुलींच्या आईने दाद मागूनही न्याय न मिळाल्याने थेट मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत.

या महिलेने मंगळवारी (16 मार्च) धर्मदममधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याची घोषणा केली. त्यांच्या दोन मुलींवर 2017 मध्ये बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर घरातच त्या फाशी घेतलेल्या स्थितीत मृत आढळल्या होत्या. यानंतर वारंवार दाद मागूनही मुलींना न्याय मिळाला नाही .“मला माझ्या मुलींसीठी न्याय हवा आहे. मी तिरुवनंतपुरममध्ये मुख्यमंत्र्यांना भेटले आणि रडले, माझ्या मुलींच्या गुन्हेगारांना शिक्षा मिळावी म्हणून विनंती केली. मात्र, त्यांच्याकडून दोषींवर कारवाई झाली नाही. त्यामुळेच मी मुख्यमंत्री विजयन यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय.”

त्या मुलींच्या आईने या प्रकरणाचा तपास करणाऱ्या 2 पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात सरकारकडून कारवाई न झाल्यानं मुंडण केलं होतं. त्यांनी या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी केरळमध्ये कासरगोड ते तिरुवनंतपुरम अशी निती यात्रा सुरु केली आहे . ती यात्रा 4 एप्रिल रोजी संपणार आहे.

मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दुसऱ्यांदा निवडून येण्याच्या आशेने धर्मदरमधून अर्ज भरलाय. मात्र, त्यांच्यासमोर भाजपसोबतच इतर पक्ष आणि या अपक्ष उमेदवार आईचं कडवं आव्हान असणार आहे. धर्मदममधून भाजपनं प्रदेशाध्यक्ष के पद्मनाभन यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील यूडीएफ आघाडीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नाही.

केरळ उच्च न्यायालयाने या खटल्याची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर एलडीएफ सरकारने दोन्ही बहिणींच्या मृत्यूची तपासणी सीबीआयला देण्याचा निर्णय जानेवारीमध्ये घेतला होता.

Mother of rape victim girls announce about contesting assembly election against CM P Vijayan in Keral

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती