ठाकरे सरकारच्या निषेधार्थ 100 हून जास्त खेळाडू परत करणार शिवछत्रपती पुरस्कार, शासकीय नोकरीचे आश्वासन आघाडी सरकारने पाळलेच नाही

More than 100 players to return Shivchhatrapati award in protest of Thackerays govt

वर्षभरापूर्वी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त झालेल्या खेळाडूंना शासकीय नोकरीत सामावून घेतले जाईल, असे आश्वासन ठाकरे सरकारने दिले होते. परंतु अद्यापही ते पाळलेले नाही. यामुळे या खेळाडूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून 19 फेब्रुवारीपर्यंत निर्णय न घेतल्यास 24 फेब्रुवारीला पुरस्कार परत करणार असल्याचे जाहीर केले आहे. More than 100 players to return Shivchhatrapati award in protest of Thackerays govt


विशेष प्रतिनिधी

मुंबई : वर्षभरापूर्वी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त झालेल्या खेळाडूंना शासकीय नोकरीत सामावून घेतले जाईल, असे आश्वासन ठाकरे सरकारने दिले होते. परंतु अद्यापही ते पाळलेले नाही. यामुळे या खेळाडूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून 19 फेब्रुवारीपर्यंत निर्णय न घेतल्यास 24 फेब्रुवारीला पुरस्कार परत करणार असल्याचे जाहीर केले आहे.

राज्यातील 100 हून अधिक पुरस्कारप्राप्त खेळाडूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येत ठाकरे सरकारला आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी निवेदन दिले आहे. विविध जिल्ह्यांतील क्रीडा कार्यालयांमार्फत हे निवेदन देण्यात आले आहे.उत्कृष्ट कामगिरी करून खेळाडू देशपातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्याचा नावलौकिक करतात. सरकारकडून त्यांचा सन्मान करत शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारही देण्यात येतो. परंतु, खेळासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या या खेळाडूंच्या वाट्याला नंतर उपेक्षाच आलेली दिसून येत आहे. नोकरीसाठी त्यांच्यावर भटकण्याची वेळ आलेल आहे. ठाकरे सरकारने त्यांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याचे वचन दिले होते, परंतु ते अद्यापही पाळलेले नाही. त्यामुळे हे सर्व खेळाडू आता एकत्र येऊन पुरस्कार परत करणार आहेत.

More than 100 players to return Shivchhatrapati award in protest of Thackerays govt

More than 100 players to return Shivchhatrapati award in protest of Thackerays govt

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी