वसुलीही नीट मोजून! सचिन वाझेंच्या मर्सीडिझमध्ये पैसे मोजण्याची मशीन

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ठेवल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे. त्यांची मर्सिडिझ गाडीही राष्ट्रीय  तपास यंत्रणेनेने (एनआयए) जप्त केली आहे. या गाडीमध्ये पैसे मोजण्यचे मशीन सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ठाकरे सरकारची वसुली वाझे करायचे असाही आरोप होत आहे.  Money counting machine in Sachin Waze’s Mercedes


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ठेवल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे. त्यांची मर्सिडिझ गाडीही राष्ट्रीय तपास यंत्रणेनेने (एनआयए) जप्त केली आहे. या गाडीमध्ये पैसे मोजण्यचे मशीन सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ठाकरे सरकारची वसुली वाझे करायचे असाही आरोप होत आहे.
ही मर्सिडिज गाडीच्या सचिन वाझेंशी असलेल्या कनेक्शनबाबतही माहिती दिली आहे. मंगळवारी संध्याकाळी ही काळी मर्सिडीज ताब्यात घेतल्यानंतर एनआयएच्या वरिष्ठ अधिकाºयांनी या गाडीची कसून तपासणी केली. तसेच त्यामधून अनेक वस्तू ताब्यात घेतल्या. ही मर्सिडीज सचिन वाझे चालवायचे, असा गौप्यस्फोट एनआयएच्या अधिकाऱ्यानी केला आहे. याबाबत अधिक माहिती देताना एनआयएचे आयजी अनिल शुक्ला यांनी सांगितले की, एनआएने आज संध्याकाळी एक मर्सिडिज ताब्यात घेतली आहे. ही मर्सिडिज सचिन वाझे चालवायचे. तसेच या मर्सिडिजमधून स्कॉर्पिओची नंबरप्लेट, पाच लाख रुपये रोख रक्कम, नोटा मोजण्याची मशीन आणि काही कपडे जप्त करण्यात आले आहेत. आता ही मर्सिडीज कुणाची आहे, याचा शोध सुरू आहे, असे एनआयएचे अधिकारी शुक्ला यांनी सांगितले.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओच्या चौकशीत मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. वाझे प्रकरणातील इनोव्हा कारची माहिती मिळाल्यानंतर एनआयए आता मर्सिडीज कारचीही चौकशी शोध घेत होती. ही मर्सिडीज कारही तपासणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.

एनआयएच्या सात ते आठ अधिकाऱ्यानी या मर्सिडीज कारच्या डिक्कीची पाहणी केली. या तपासणीदरम्यान व्हिडीओ रेकॉर्डिंगही केलं जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात या मर्सिडिज कारची भूमिका स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ इतकीच महत्वाची असल्याचं बोललं जात आहे. एनआयएच्या हाती एका मर्सिडिज कारचं सीसीटीव्ही फुटेज हाती लागलं होतं. हे सीसीटीव्ही फुटेज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळचं असल्याचं सांगण्यात येत आहे. याच मर्सिडिजमध्येच मनसुख हिरेन यांनी शेवटचा प्रवास केला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मनसुख हिरेन कुणाची तरी वाट पाहत होते. काही वेळाने त्यांच्याजवळ ही मर्सिडिज कार येते. हिरेन त्या गाडीत बसून निघून जात असल्याचं त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे. हे सीसीटीव्ही फुटेज मनसुख हिरेन बेपत्ता होण्याच्या काळातले आहे.

ही मर्सिडीज कार स्वत: सचिन वाझेच वापरत असल्याची माहिती समोर येत आहे. या कारला अनेकदा बनावट नंबर प्लेट लावण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे आता या मर्सिडीज कारच्या डिक्कीतून एनआयएच्या हाती नेमके कोणते पुरावे लागतात हे महत्वाचं ठरणार आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*