मोदींनी तर काँग्रेसला ‘ धो डाला ‘ ; सौ सुनार की एक लौहार की

  • मोदी जी आज तो धो डाला अशा अफलातून प्रतिक्रिया सोशल मिडीयावर येत आहेत . सौ सुनार की एक लोहार की असं काहीसं लोकसभेत पाहायला मिळालं
  • चर्चिल्स सिगार असिस्टंट हे पद चर्चिल गेल्यावरही कायम होते.याबद्दल मजेशीर किस्सा मोदींनी सांगितला  
  • काँग्रेसच्या ‘जैसे थे’ राजकारणावर हल्ला 

विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : उठसूट पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या  काँग्रेसवर आज मोदींनी चोहोबाजूने  हल्ला  केला .Modiji today ‘washed’ the Congress; Of a blacksmith of a hundred goldsmiths

काँग्रेसच्या मानसिकतेवर आणि आहे तशीच स्थिती ठेवण्याच्या मानसिकतेवर टीका करताना मोदींनी तामिळनाडूमधील एक किस्सा लोकसभेत सांगितला. आम्ही बदल घडवण्यासाठी आलो आहोत आणि त्यासाठी प्रयत्न करणारच. साचलेलं पाणी रोगराई आणतं आणि वाहतं पाणी जीवन फुलवतं असं सांगायलाही मोदी विसरले नाहीत.

मोदींनी सांगितलेला तामिळनाडुतील किस्सा

तामिळनाडुत साठच्या दशकात राज्य कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यावर विचार करण्यासाठी एक कमिशन बसवलेलं होतं. त्या कमिशनच्या चेअरमनकडे एक लिफाफा (पत्र) आला. त्यावर टॉप सिक्रेट असं लिहिलं होतं. त्यात एक अर्ज होता. अर्ज करणाऱ्याने मागणी केली होती की, माझा पगार वाढवला जावा.मी खूप वर्षापासून काम करतोय. इमानदारीने काम करतोय. चेअरमनने त्या अर्जदाराला उत्तर लिहिलं की, तुम्ही कोण आहात? काय करता? अर्जदारानं उत्तर पाठवलं, मी सीसीएच्या पदावर काम करतो. मुख्य सचिवांच्या बाजूला बसतो. उत्तर वाचून चेअरमनला आश्चर्य वाटलं. त्यानं पुन्हा विचारलं, हे सीसीए नेमकं काय आहे? आम्हाला तर काहीच माहीत नाही.

अर्जदारानं पुन्हा पत्र लिहून सांगितलं की, मला माहिती नाही .  मग तू माझं डोकं कशाला खातोयस, जे कमिशन 1975 नंतर येईल, त्यांच्याकडे पगारवाढीची मागणी कर. अर्जदाराला वाटलं, हे तर बिघडलं सगळं.

Modiji today ‘washed’ the Congress; Of a blacksmith of a hundred goldsmiths

त्यानं चेअरमनला पुन्हा उत्तर लिहिलं आणि सांगितलं सीसीएचा अर्थ आहे, चर्चिल्स सिगार असिस्टंट हे माझं पद आहे आणि या पदावर मी काम करतो.

1940 मध्ये विन्स्टन चर्चिल ब्रिटनचे पंतप्रधान झाले आणि त्यांना त्रिचीहुन सिगारेट जात होती. सीसीएचं काम होतं की, ती सिगारेट पोहोचली की नाही ते पाहाणं. 1945 मध्ये चर्चिल निवडणूक हरले. पण ते पद तसच राहीलं. सिगारेटचा सप्लायही कायम राहीला. देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतरही ते पद कायम राहीलं. त्या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने स्वत:च्या पगारवाढीची मागणी केली होती. जर आहे ती स्थिती बदलली नाही तर काय सुरु असतं त्याचं हे उदाहरण.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*