सत्तेचे हस्तांतरण शांतिपूर्ण पध्दतीने सुरू राहायला हवे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन


वॉशिंग्टन डीसीमध्ये दंगल आणि हिंसेच्या बातम्या पाहून व्यथित झालो. सत्तेचे हस्तांतरण सहजपणे आणि शांतिपूर्ण पद्धतीनं सुरू राहायला हवे. लोकशाही प्रक्रियेला बेकायदेशीर विरोधांच्या माध्यमातून विकृत करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. modi says transfer of power must continue peacefully


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : वॉशिंग्टन डीसीमध्ये दंगल आणि हिंसेच्या बातम्या पाहून व्यथित झालो. सत्तेचे हस्तांतरण सहजपणे आणि शांतीपूर्ण पद्धतीनं हस्तांतरण सुरू राहायला हवे. लोकशाही प्रक्रियेला बेकायदेशीर विरोधांच्या माध्यमातून विकृत करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. modi says transfer of power must continue peacefully

अमेरिकेत नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष पदासाठी जो बायडन आणि उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी कमला हॅरिस यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी बुधवारी अमेरिका संसदेच्या दोन्ही सदनांचे सदस्य एकत्र जमले होते. याच दरम्यान मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शेकडो समर्थकांनी संसद परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला.


अमेरिकेत बेरोजगारी गगनाला भिडली; १ कोटी तरुणांचा बेरोजगार भत्यासाठी अर्ज


या दरम्यान करण्यात आलेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या संसदभवनाच्या बाहेर ट्रम्प समर्थक आणि पोलिसांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीनंतर परिसरात प्रवेश बंद करण्यात आला. ‘सुरक्षेच्या कारणामुळे’ कोणत्याही व्यक्तीला या परिसरातून बाहेर जाण्यास किंवा आत येण्यास बंदी घालण्यात आली.

अमेरिकेत ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो बायडेन यांना ३०६ तर डोनाल्ड ट्रम्प यांना २३२ मतं मिळाली होती. निवडणुकांचे निकाल आल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प हार मानायला तयार नाहीत. मतमोजणीवेळी फेरफार झाल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आलाय.

modi says transfer of power must continue peacefully

अनेक राज्यांत ट्रम्प यांच्या समर्थकांकडून गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्याचं स्पष्टपणे दिसून येतंय. दोन प्रकरणांत सर्वोच्च न्यायालयानंही त्यांची याचिका फेटाळून लावली.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती