मोदी म्हणतात, शेतकरी – सरकारमध्ये एका कॉलचे अंतर; काँग्रेस नेते म्हणतात, सरकार अहंकारी!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, शेतकरी आंदोलक आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये फक्त एका कॉलचे अंतर आहे; तर काँग्रेस नेते म्हणतात, सरकार अहंकारी आणि तोडग्यामध्ये स्वतःच खोडा घालणारे आहे… या वाक्यांमध्ये आजच्या सर्वपक्षीय बैठकीचे सार सांगता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलविलेल्या बैठकीस सर्व पक्षांचे संसदीय नेते हजर होते. त्यात पंतप्रधानांनी शेतकरी आंदोलनाबाबत सरकारची भूमिका मांडली.Modi says farmers one call gap in government Congress leaders say government is arrogant

पंतप्रधान म्हणाले, मी कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलेलाच मुद्दा पुन्हा सांगतो. शेतकरी आणि सरकार यांच्यात अंतिम तोडगा भलेही निघाला नसेल, पण सरकार शेतकऱ्यांसमोर पर्याय ठेवत आहे. शेतकऱ्यांनी यावर चर्चा करावी. त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं आहे की, शेतकऱ्यांपासून ते फक्त एका कॉलच्या अंतरावर आहेत,” असे मोदी म्हणाले. पण काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी सरकारच्या भूमिकेला आडमुठे ठरवत सरकार अहंकारी भूमिकेतून कृषी कायदे पुढे रेटत असल्याचे म्हटले आहे.कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन सुरू आहे. मागील काही दिवसांपासून आंदोलनाची धार वाढली असून, संसदेच्या अधिवेशनातही याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. दिल्लीत हिंसाचार घडल्यानंतरही मोदींनी भाष्य करणे टाळले होते. मात्र, आजच्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनाबद्दल मौन सोडले.

“सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. सर्व विषयांवर चर्चा केली जाईल. सर्व पक्षांना आपली भूमिका मांडण्याची संधी दिली जाईल. कृषीमंत्री नरेद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना दिलेला प्रस्ताव अजूनही कायम आहे. शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे. त्यांनी आपल्या समर्थकांना याबद्दल सांगावे. चर्चेतूनच तोडगा निघायला हवा. आपण सगळ्यांनी देशाबद्दल विचार करावा लागेल.

संसदेने मंजूर केलेले कायदे पूर्णपणे मागे घेण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. काँग्रेस पक्षाचीही तीच मागणी आहे. काँग्रेस नेत्यांनी सर्वपक्षीय बैठकीत ही भूमिका मांडली. सरकार अहंकारी भूमिकेतून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नसल्याचा आरोप काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी केला. शिवसेना नेते विनायक राऊत, अकाली दलाचे नेते बलदेवसिंग बुंदेर, गुलाम नबी आझाद आदींनी शेतकरी आंदोलनाचा मुद्दा बैठकीत लावून धरला होता.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारपासून सुरू झालं. मात्र, शेतकरी आंदोलनाविषयी सरकारच्या भूमिकेवर टीका करत विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर आज पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधानांनी कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनाबद्दल सरकारची भूमिका मांडली.

Modi says farmers one call gap in government Congress leaders say government is arrogant

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती