इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूने कोविड -19 लस दिल्याबद्दल ‘प्रिय देश’ म्हणत भारताचे आभार मानल्यानंतर त्यांना पाकिस्तानी आणि कट्टर ईस्लामवाद्यांनी ट्रोल केले होते. मात्र आता पंतप्रधान मोदींनी केव्हिन पीटरसनला रिप्लाय दिला आहे .Modi responds to Kevin Pietersen Dear India with Vasudhaiva Kutumbakam
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दक्षिण आफ्रिकेत पोहोचलेल्या इंडिया कोविड – 19 लसीची छायाचित्रे शेअर केल्यावर त्यावर प्रतिक्रिया दिली.
पिटरसन यांनी भारताबद्दल कृतज्ञता व्यक्त करत प्रिय देश असे संबोधले. मात्र हि गोष्ट कट्टर ईस्लामवाद्यांना रुचली नाही. त्यांनी पीटरसन वर आगपाखड करत नको त्या कमेंट्स केल्या . त्याउलट भारतीय जनतेने यासाठी पीटरसनचे आभार व्यक्त केले होते. आता दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदींनी केव्हिन पीटरसनच्या ट्विटला रिप्लाय दिला आहे .ते म्हणाले ,
तुमचे भारताबद्दलचे प्रेम पाहून मला आनंद झाला. हे संपूर्ण जग म्हणजे आमचं कुटुंब आहे असं आम्ही मानतो आणि कोविड -19 विरुद्धचा लढा बळकट करण्यासाठी आम्ही आमची भूमिका निभावू इच्छीतो .एकंदरीत वसुधैव कुटुंबकम् चा संदेश मोदींनी आपल्या ट्विट द्वारे दिला आहे .
Glad to see your affection towards India. 🙂
We believe that the world is our family and want to play our role in strengthening the fight against COVID-19. https://t.co/zwpB3CNxLG
— Narendra Modi (@narendramodi) February 3, 2021
या क्रिकेटपटू सुपरस्टारचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला होता पण नंतर ते इंग्लंडला गेले.आणि इंग्लडकडूनच क्रिकेट खेळत राहिले.पीटरसन यांनी जयशंकर यांच्या ट्विटला उत्तर देऊन म्हटले की, “भारतीय औदार्य आणि दयाळूपणा प्रत्येक दिवसात अधिकाधिक वाढत आहे प्रिय देश! ”