आधुनिक बहिणाबाईंच्या ‘जात्यावरच्या’ मोदी-ओव्या : मोदींची अविचल राष्ट्रभक्ती, शब्दाला जागणारा नेता व संकटात ही मार्ग काढण्याचा स्वभावामुळे मोदी लोकप्रिय

विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : असं नव्हतं झाल कधी गं…निवडून आला मोदी…पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ तरूणाईतच लोकप्रिय नाहीत तर वयोवृद्धांमध्ये देखील ते तितकेच लोकप्रिय आहेत. ग्रामीण भागातील या आजीबाईंचे गाणे प्रचंड व्हायरल होत आहे .यात त्या मुक्तकंठाने मोदी यांच्या कार्याची वाखाणणी करत आहेत . त्यांनी सुरेल आणि लयदार शैलित मोदींनी आत्तापर्यंत केलेल्या कार्याचे कौतूक केले आहे. Modi is popular because of his unwavering patriotism, word-of-mouth leader and his ability to find a way out of crisis

या आजीबाईंचे वय 70-80 दरम्यान असावे त्यामुळे त्यांनी आजपर्यंतचे बरेच राजकारण अनुभवले आहे त्यांनी त्यांच्या या ओव्यांमध्ये स्पष्ट केले आहे की यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं . मोदींनी त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत काय काय केले हे सर्व या आज्जीबाईंना ठाऊक आहे.

भाजपा ला व पर्यायाने मोदींना परास्त करणे दिवसेंदिवस कठीण होत जात आहे. मोदी लोकप्रिय का आहेत ? कोणकोणत्या वर्गात, कोणकोणत्या वयोगटात आहेत हे समजून घेतले तर लक्षात येईल की मोदींचा युएसपी त्यांची अविचल राष्ट्रभक्ती, शब्दाला जागणारा नेता व संकटात ही मार्ग काढण्याचा स्वभाव हा आहे. ह्या आजीबाईंना जे दिसलं लक्षात आलं ते भल्या भल्या पोलिटिकल पंडितांनाही लक्षात येत नाही. या आधुनिक बहिणाबाईंच्या ‘जात्यावरच्या’ या मोदी-ओव्या नक्की ऐका. सलाम या आजीबाईंना !

Modi is popular because of his unwavering patriotism, word-of-mouth leader and his ability to find a way out of crisis

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*