अहंकारी मोदी सरकारला शेतकऱ्यांचे दुःख दिसत नाही; सोनियांची घणाघाती टीका; आंदोलनाच्या ३९ व्या दिवशी पत्र

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्राने लादलेल्या कृषी बिलांविरोधात शेतकरी आंदोलनाला बसून ३९ दिवस उलटून गेलेत. शेतकरी कडाक्याच्या थंडीत आणि पावसात दिल्लीच्या सीमेवर बसलेत. हे अंहकारी सरकार त्यांच्याबद्दल सहानुभूतीचा एक शब्दही काढायला तयार नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी पत्राद्वारे केली आहे. Modi govt should remember that democracy means protecting public & farmers interests Congress Interim President Sonia Gandhi

शेतकरी आंदोलनाच्या ३९ व्या दिवशी सोनिया गांधींचे हे पत्र काँग्रेसने प्रसिद्धीस दिले आहे. त्यात सोनियांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. हजारो शेतकरी तहानलेले – भुकेलेले राहून आंदोलन करत आहेत. ५० हून जण या आंदोलनात शहीद झाले आहेत. परंतु, अहंकारी सरकारच्या पंतप्रधानांनी किंवा कोणाही मंत्र्याने त्याबद्दल सहानुभूतीचे उद्गार काढलेले नाहीत की त्यांच्या विषयी कोणी कणव दाखविलेली दिसली, असे टीकास्त्र सोनियांनी मोदी सरकारवर सोडले आहे.स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात आलेले हे पहिले अहंकारी सरकार असेल, की ज्याला देशातील सामान्य जनतेचे दुःख तर दिसत नाहीच, पण अन्नदात्या शेतकऱ्यांचे दुःखही त्यांना दिसेनासे झाले आहे. हे सरकार निर्दयी आहे. मूठभर उद्योगपतींचे खिसे भरणे हाच या सरकारचा अजेंडा आहे, अशी टीकाही सोनिया गांधींनी पत्रात केली आहे.

Modi govt should remember that democracy means protecting public & farmers interests Congress Interim President Sonia Gandhi

काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी सध्या इटलीत आहेत. त्यांनी इटलीला रवाना होण्यापूर्वी शेतकऱ्यांना लढण्याची प्रेरणा देणारे ट्विट केले होते. त्यानंतर सुमारे चार दिवसांनी आणि शेतकरी आंदोलन सुरू झाल्याच्या ३९ दिवसांनी सोनिया गांधी यांचे पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. सोनिया गांधी या देखील परदेशात असल्याचे बोलले जात आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*