आर्थिक सुरक्षेची जाणीव वाढली; मोदी सरकारच्या पेन्शन स्किममध्ये वर्षभरात 65 लाख खातेधारकांची भर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – आर्थिक सुरक्षिततेविषयीच्या काळजीत भर पडली असून त्या विषयी जागरूकताही निर्माण झाली आहे. केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या पेन्शन योजनेच्या आकडेवारीतून हे अधिक स्पष्ट होत आहे. Modi govt pension scheme gets huge response from young indians

फेब्रुवारी 2021च्या शेवटपर्यंत राष्ट्रीय पेन्शन आणि अटल पेन्शन योजनाच्या खातेधारकांची ही संख्या 22% ने वाढून 4.15 कोटी झाली आहे.पेन्शन क्षेत्रच्या अंतर्गत पेन्शन फंड रेग्युलेटरी ऍड डेव्हलपमेंट अथोरिटी (PFRDA) ने सांगितले कीवेगवेगळ्या योजनेअंतर्गत खाते धारकांची संख्या फेब्रुवारी 2020 पर्यंत 3.40 कोटी होतीजी आता फेब्रुवारी 2021 पर्यंतर वाढून 4.15 कोटी झाली आहे.

मागच्या वर्षी कोरोना लॉकडाऊनमुळे लोकांच्या पगारात कपात झाली होता. तरीही लोकांनी त्यांच्या भविष्याचा विचार करूनया योजनेत पैसे गुंतवले आहेत. या योजनांमध्ये पैसे गुंतवले नसतील तरलवकरच याची माहिती घेऊन सुरू करा, असे आवाहन सरकार करते आहे. त्याला नागरिक चांगला प्रतिसादही देताना दिसत आहेत. यामध्ये प्रत्येकाच्या पगाराच्या स्तरानुसार वेगवेगळ्या स्किम आहेत.

केंद्राची ही योजना पेन्शनची गॅरेंन्टी देत असल्याने तिची विश्वासार्हता अधिक आहे. वय १८ ते ४० वयोगटातील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ६० वर्षापर्यंत दर महिन्याला एक ठराविक रक्कम भरावी लागेल. वयाला ६० वर्षे पूर्ण होताच प्रत्येक महिना एक ठराविक रक्कम मिळण्याची हमी या स्किममध्ये आहे.

Modi govt pension scheme gets huge response from young indians

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*