मोदी सरकारचा नवा नियम : 100 हून अधिक कर्मचारी असतील तर कँटीन मस्ट ; ओव्हरटाइमचे नियमही बदलले ;प्रत्येक कंपनीत वेलफेअर ऑफिसरची नियुक्ती

  • 100 हून अधिक कर्मचारी अस णाऱ्या प्रत्येक आस्थापनेत यापुढे कँटीन असणं आवश्यक आहे. 1 एप्रिलपासून केंद्र सरकार हा नवा नियम लागू करणार आहे. Modi government’s new rule: Canteen must if there are more than 100 employees

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कामगार कायद्यांचा (labour laws modi government)आधार घेत कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी काही नवीन नियम 1 एप्रिलपासून लागू करायचं ठरवलं आहे. त्यामध्ये कँटीनसंबंधी (Canteen must for 100 plus employees) एक महत्त्वाचा नियम येणार आहे. 100 हून अधिक कर्मचारी असणाऱ्या प्रत्येक आस्थापनेत यापुढे कँटीन असणं आवश्यक असेल.

100 पेक्षा जास्त कर्मचारी असणाऱ्या प्रत्येक कंपनीत कँटीन असलंच पाहिजे, असा नियम 1 एप्रिलपासून अंमलात येईल. यात काँट्रॅक्टवर असणाऱ्या कर्मचारी अथवा कामगारांचाही समावेश आहे. तसंच कामगार कल्याण कायद्यांबाबत अधिक जागरुता निर्माण करण्यासाठी मोदी सरकारने आणखी काही बदल करण्याचं योजलं आहे .

कामगारांना सरकारी नियम आणि कायद्यांची माहिती देण्याकरता किंवा सरकारी योजना उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक कंपनीत एक वेलफेअर ऑफिसरची नियुक्ती करणं बंधनकारक असेल.



कर्मचारी अथवा कामगारांना ऑफिस किंवा कामाच्या जागेवरून प्रवास करून साइटवर नेलं जात असेल किंवा जायला लागत असेल आणि त्याच दिवशी ते परत घरी येणार असतील तर त्यांना प्रवास भत्ता देणंही आवश्यक आहे.

ओव्हरटाइमचे नियमही केंद्र सरकारने बदलले आहेत. ओव्हरटाइम कशाला म्हणायचं याचे नियम बदलण्यात आले आहेत. आतापर्यंत कामाच्या वेळेनंतर किमान अर्धा तास थांबावं लागलं तर ओव्हरटाइम मोजला जायचा. आता ही वेळ 15 मिनिटांची असेल. म्हणजे कामगार त्याच्या कामाच्या वेळेनंतर 15 मिनिटांपेक्षा अधिक वेळ थांबणार असेल तर त्याला ओव्हर टाइम लागू करण्यात यावा, अशी तरतूद नव्या नियमात आहे.

Modi government’s new rule: Canteen must if there are more than 100 employees

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*