मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार अयोध्येचा दौरा ; सून बाई जोरात..बैठकीत मिताली ठाकरेंनी लक्ष वेधले


विशेष प्रतिनिधी

मुंबई: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची महत्त्वाची बैठक पार पडली. मुंबईतील या बैठकीला मनसेचे राज्यातील बडे नेते उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना संबोधित केले .राज ठाकरे हे मार्च महिन्यात अयोध्येचा दौरा करणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. MNS president Raj Thackeray to visit Ayodhya

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा मेगा प्लॅन केला आहे असेही ते म्हणाले.

27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांची जयंती हा मराठा राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मनसे हा दिवस सण, उत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा केला जाईल. त्या दिवशी मराठी स्वाक्षरी मोहिम सुरु करण्यात येईलराज ठाकरे मुंबई आणि ठाणेमध्ये सही करण्यासाठी जातील. मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांचा, संस्थाचालक, मराठी प्रकाशक, संपादक, कवी, लेखक, खेळाडू यांचा सन्मान मनसे करणार आहे. मराठी वृत्तपत्रे आणि मराठी वृत्तवाहिन्या, नाट्य कलावंत आणि सिनेकलावंत यांचा सन्मान करण्यात येणार आहे, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते अमित यांची पत्नी मिताली ठाकरे यांनी.मिताली ठाकरे पहिल्यांदाच मनसेच्या राजकीय कार्यक्रमात दिसल्या.

MNS president Raj Thackeray to visit Ayodhya

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था