सिटी को-ऑप बॅंक घोटाळाप्रकरणी आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात आमदार राणांची ईडीकडे तक्रार

सिटी को-ऑप बॅंक घोटाळ्यात शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा सहभाग असल्याचा आरोप करत बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी ईडी कार्यालयात कागदपत्रं सादर केली आहेत. ईडी कार्यालयात स्वत:हून आलो असून आनंदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत जो घोटळा केलाय, त्याबाबत कागदपत्रे ईडीला दिली आहेत, असं रवी राणांनी सांगितले. MLA Rana’s complaint to ED against Anandrao Adsul in City Co-op Bank scam


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सिटी को-ऑप बॅंक घोटाळ्यात शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा सहभाग असल्याचा आरोप करत बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी ईडी कार्यालयात कागदपत्रं सादर केली आहेत. ईडी कार्यालयात स्वत:हून आलो असून आनंदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत जो घोटाळा केलाय, त्याबाबत कागदपत्रे ईडीला दिली आहेत, असं रवी राणांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी सिटी को-ऑप बँकेतील घोटाळ्यावरुन आनंदराव अडसूळ यांच्यावर आरोप केले होते. सिटी को-ऑप बँकेच्या मुंबईमध्ये 13-14 शाखा आहेत. या बँकेत 900 खातेदार आहेत. ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटलेली कर्ज कारणीभूत असल्याचा आरोप रवी राणांनी केला.आनंदराव अडसूळांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्यानं दिली. आता खातेदारांना केवळ 1 हजार एवढी रक्कम मिळत आहे. मराठी मतांवर राजकारण करणाऱ्यांनीच मराठी लोकांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप रवी राणांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर कारवाई करणार का ? असा सवाल करून रवी राणा यांनी म्हटले आहे की, सरकार आनंदराव अडसूळ यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. अडसूळ यांची केस दाबण्याचा प्रयत्न होतोत. मात्र, ईडीकडून अडसूळ यांच्यावर कारवाई होईल, अशी अपेक्षा आहे.

MLA Rana’s complaint to ED against Anandrao Adsul in City Co-op Bank scam

बँकिंग क्षेत्रात जे खूप मोठ्या बाता करतात, त्यांच्याकडे पीएमसी बँकेचे पैसे पोहोचले आहेत. काही महिन्यांपूर्वी सिटी बँकेचे गुंतवणूकदार आले होते, आनंदराव अडसूळ यांचा विषय पुढे लावून धरणार. पीएमसी बँक असो किंवा सिटी बँक, दोषींवर कारवाई होणार असा इशारा सोमय्यांनी दिला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*