मिताली राजचा धडाका सुरूच ; ‘दशहजारी’ विक्रम! कोणत्याही भारतीय महिला खेळाडूला न जमलेला रेकॉर्ड केला नावावर

  • 1999 मध्ये आयर्लंडविरुद्धच्या सामन्याद्वारे मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 10 हजार धावा पूर्ण करण्यासह मिताली क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधार राहिलेली महिला क्रिकेटपटू आहे. तसेच 200हून अधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम देखील तिच्या नावावर आहे.  सलग 111 एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळण्याचा देखील विक्रम तिच्याच नावावर आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 6 हजार 938 धावांचा विक्रम तिच्या नावावर आहे.  
  • मितालीच्या या विक्रमानंतर  BCCI नं ट्वीट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेक खेळाडूंनी आणि दिग्गजांनी देखील तिचं अभिनंदन केलं आहे. मितालीनं आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये आत्तापर्यंत 310 सामने खेळले आहेत. 310 सामन्यात तिनं 10 हजार धावा पूर्ण केल्यात. 

वृत्तसंस्था 

लखनउ : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये महिला एकदिवसीय मालिका सुरू आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजनं नवा इतिहास रचला आहे.  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडणारी मिताली राज ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. जगात केवळ दोनच महिला क्रिकेटर्सला हा टप्पा पार करता आला आहे.  मिताली ही जगभरात केवळ दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. याआधी इंग्लंडच्या शेरलोट एडवर्ड्सनं 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. एडवर्ड्सनं  10 हजार 273 धावा केल्या असून एडवर्ड्स निवृत्त झाली आहे. पण मिताली अजूनही खेळत असून आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा बहुमान देखील मिताली लवकरच मिळवेल .MITALI RAJ First Indian woman batter to score 10K international runs

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघात शुक्रवारी (१२ मार्च) तिसरा वनडे सामना पार पडला. लखनऊ येथे झालेला हा सामना अत्यंत रोमांचक ठरला. मागील सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी पाहुणे झगडताना दिसले. तर यजमानांनी विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी आपले उत्कृष्ट देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान भारतीय संघाची कर्णधार मिताली राज हिने मोठा किर्तीमान आपल्या नावे केला.

नाणेफेकीचा निकाल दक्षिण आफ्रिका संघाच्या बाजूने लागल्यानंतर त्यांनी गोलंदाजी निवडली आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पहिल्या १२ षटकांनतर संघाने २ बाद ६४ धावा फलकावर नोंदवल्या होत्या. यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत मितालीने ३६ धावा चोपल्या. या खेळीसाठी तिने ५० चेंडू खेळले आणि ५ चौकार मारले.या छोटेखानी पण महत्त्वपुर्ण खेळीसह मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील १०००० धावांचा टप्पा पार केला. आजवर वनडे क्रिकेटमध्ये तिने २१२ सामने खेळताना ५०.६४ च्या सरासरीने ६९७४ धावा केल्या आहेत. तर ८९ टी२० सामन्यात २३६४ धावा आणि १० कसोटी सामन्यात ६६३ धावा नोंदवल्या आहेत. अशाप्रकारे तिन्ही स्वरुपात मिळून तिने एकूण १०००१ धावा कुटल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा आकडा गाठणारी मिताली जगातील दुसरी आणि भारतातील पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे. याबाबतीत तिने सुझी बेट्स आणि स्टिफनी टेलर यांना पिछाडीवर टाकले आहे. न्यूझीलंडची क्रिकेटपटू सूझी बेट्स ७८४९ धावांसह सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. तर वेस्ट इंडिजची क्रिकेटपटू स्टेफनी टेलर ७८१६ धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

इंग्लंडची फलंदाज शार्लेट एडवर्ड्स ही अव्वलस्थानी विराजमान आहे. तिने मितालीपेक्षा २७२ धावा जास्त करत अव्वलस्थानावर ताबा मिळवला आहे.

MITALI RAJ First Indian woman batter to score 10K international runs

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला क्रिकेटपटू: 

शार्लेट एडवर्ड्स     १०२७३ धावा

मिताली राज          १०००१ धावा
सूझी बेट्स            ७८४९ धावा
स्टेफनी टेलर        ७८१६ धावा

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*