जीएसटी परताव्याचा ६००० कोटींचा १० वा आठवडी हप्ता केंद्राने राज्यांना पाठविला; आत्तापर्यंत ६० हजार कोटींचा परतावा राज्यांच्या खात्यांमध्ये जमा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कराचा अर्थात जीएसटी भरपाईचा ६००० कोटींचा १० व्या आठवड्याचा हप्ता आज केंद्र सरकारने राज्य सरकारांना आणि केंद्र शासित प्रदेशांना दिला आहे. आतापर्यंत ६० हजार कोटींचे हप्ते केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिले आहेत, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. Ministry of Finance releases 10th weekly instalments of Rs.6000 crores to States to meet GST compensation shortfall.जीएसटीचा परतावा हा राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात कायमच वादाचा विषय झाला आहे. त्यात राजकीय पासून प्रशासकीय वादही गुंतले आहेत. डिसेंबर २०२० पर्यंत १.१५ लाख कोटी रूपयांचा जीएसटी जमा झाल्याची बातमी कालच केंद्रीय अर्थ मंत्रालयातून देण्यात आली होती.

Ministry of Finance releases 10th weekly instalments of Rs.6000 crores to States to meet GST compensation shortfall.

या पार्श्वभूमीवर १० व्या आठवड्यातला ६००० कोटींचा परतावा सर्व राज्य सरकारांच्या आणि जम्मू – काश्मीर, लडाख, दिल्ली, पदुचेरी या केंद्र शासित प्रदेशांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती अर्थ मंत्रालयातून देण्यात आली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*