मुलीच्या कुटुंबासमवेत मंत्र्याचे फोटो फेसबुकवर झळकले

वृत्तसंस्था

पुणे : पुण्यात आत्महत्या केलेली मुलगी मूळची बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील आहे. विदर्भातील तो मंत्री तरुणीच्या घरीही गेला होता. तो मंत्री आणि तिच्या कुटुंबासमवेत मंत्र्याचे फोटोही फेसबुकवर आहेत. minister photo with the girl family flashed on Facebook

भीड में सभी लोग अच्छे नही होते और अच्छे लोगों की भीड नही होती,`असे त्या फोटोवर म्हटले आहे. 2019 या वर्षाच्या अखेरीस एक पोस्ट संबंधित तरुणीने लिहिली आहे. त्यात म्हटले आहे की 

“आज या वर्षाचा शेवट होतोय. या वर्षाच्या शेवटी माझ्या आयुष्यात बर्‍याच वाईट व बर्‍याच चांगल्या गोष्टी घडल्या. पण प्रत्येक वेळी मला अनुभव मिळाला. या वर्षी मला भरपूर निःस्वार्थ प्रेम पाठबळ मिळत आहे नेहमी मिळत रहावे. धन्यवाद सर्वांचे. मी आपल्याला शब्द देते मी कोणाच्याही विश्वासाला तडा न जाऊ देता होईल तेवढी साथ देईल. सर्वाच्या होईल तेवढी कामी येईल.

या वर्षी संघर्षातून मला माझ्याअडचणीतून मार्ग काढता आला आणि मला आनंद आहे मला कुठेतरी स्वतः ला सिद्ध करता आले. आईवडीलांच्या मी कामी आले. बरेच चांगलेवाईट अनुभव आले. काही लोक लांबली. त्याहुन चांगली माणसं माझ्या आयुष्यात आली आणि मला प्रत्येक वेळी सावली सारखी साथ देणाऱ्या माझ्या सर्व जिवाभावाच्या भावंडांना, मित्रमैत्रिणींना धन्यवाद, मी आपली नेहमी आभारी असेन.

कधी चुकून कोणाच्या भावना माझ्याकडून दुखावल्या गेल्या असतील मी क्षमस्व आहे.  मोठ्या मनाने मला माफ करा, असे या तरुणीने म्हटले आहे. माझे कधी कोणासोबत भांडण झाले असेल त्यात चूक कोणाचीही असू द्या. मी माफी मागते. नवीन वर्षाची नवीन सुरुवात करू, ही अपेक्षा व्यक्त करते.“ त्यानंतर
या तरुणीने 2020 आणि 2021 मध्ये मात्र या मंत्र्यासोबत एकही फोटो शेअर केला नाही.

minister photo with the girl family flashed on Facebook

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*