राज्य मंत्री बच्चू कडू आणि पोलीसांच्या छळामुळे शेतकऱ्याचा आत्महत्येचा इशारा, कडू यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करा


शेतातून अनधिकृतपणे रस्ता काढून देण्यासाठी राज्य मंत्री बच्चू कडू यांच्या सांगण्यावरून पोलीसांनी छळ केल्याने चांदूर बाजार तालुक्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्येचा इशारा दिला आहे. आपल्या पतीने आत्महत्या केल्यास राज्य मंत्री बच्चू कडू आणि येथील पोलीस जबाबदार असतील, असा आरोप या शेतकऱ्याच्या पत्नीने केला आहे. Minister of State Bachchu Kadu warns of farmer’s suicide due to police harassment


विशेष प्रतिनिधी

चांदूर बाजार : शेतातून अनधिकृतपणे रस्ता काढून देण्यासाठी राज्य मंत्री बच्चू कडू यांच्या सांगण्यावरून पोलीसांनी छळ केल्याने चांदूर बाजार तालुक्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्येचा इशारा दिला आहे.  Minister of State Bachchu Kadu warns of farmer’s suicide due to police harassment
आपल्या पतीने आत्महत्या केल्यास राज्य मंत्री बच्चू कडू आणि येथील पोलीस जबाबदार असतील असा आरोप त्याच्या पत्नीने केला आहे. चांदूरबाजार तालुक्यातील विजय सुखदेव सुने (४०) या शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.


बेकायदा फी वसूलीवरून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड – राज्यमंत्री बच्चू कडूंमध्ये जुंपली


पतीने आत्महत्या केल्यास, शिरजगावचे ठाणेदार सचिन परदेशी व बीट जमादार राजू तायडे, तहसीलदार धीरज स्थूल, राज्यमंत्री बच्चू कडू व त्यांचा खासगी सचिव दीपक भोंगाडे यांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार बेपत्ता शेतकऱ्याची पत्नी वैशाली सुने यांनी नोंदविली आहे.

वैशाली यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या शेतातून कोणाचाही रस्ता नसताना ठाणेदार परदेशी व बीट जमादार तायडे हे सुने यांना दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवून शेतातून पलीकडच्या शेतात जाण्यासाठी रस्ता लिहून मागत होते. विजय सुने रस्ता लिहून देण्यास तयार नसल्याने बीट जमादार तायडे हे देऊरवाडा येथे घरी येऊन दोन-दोन तास बसत होते व दमदाटी करीत होते.

Minister of State Bachchu Kadu warns of farmer’s suicide due to police harassment

तहसीलदारांचा आदेश आपल्या शेतातील केळी पिकाचे नुकसान करणारा आहे. त्या आदेशाने मानसिकता खराब झाली आहे. गेल्या ५-६ दिवसांपासून पोलिसांनी मला फोन करून धमकावले. मी पूर्णपणे हरलेलो आहे. म्हणून मी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने घर सोडून जात आहे, असे विजय सुने यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती