मंत्री धनंजय मुंडे पुन्हा कोरोनाला बळी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. काही महिन्यांपूर्वीही धनंजय मुंडे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मात्र आता पुन्हा एकदा त्यांना या व्हायरसची बाधा झाली आहे. Minister Dhanjay Munde again infected by coronaयाबाबत धनंजय मुंडे यांनीच आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती दिली आहे. ‘माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा,सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी,’ असं आवाहन मुंडे यांनी केलं आहे.

Minister Dhanjay Munde again infected by corona

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*