‘ममतांसमोर जय श्रीराम म्हणणे म्हणजे उन्मत्त वळूला लाल कापड दाखवण्यासारखे,’ मंत्री अनिल वीज यांची टीका

Minister Anil Vij Criticizes CM Mamata Banerjee On Jai Shri Ram

‘जय श्रीराम घोषणे’मुळे संतप्त होऊन शनिवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाषणास नकार दिला. आता जय श्रीराम घोषणेवरून भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यात वाक्युद्ध सुरू झाले आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ‘जय श्रीराम घोषणे’मुळे संतप्त होऊन शनिवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाषणास नकार दिला. आता जय श्रीराम घोषणेवरून भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यात वाक्युद्ध सुरू झाले आहे. Minister Anil Vij Criticizes CM Mamata Banerjee On Jai Shri Ram

भाजप नेते आणि हरियाणाचे मंत्री अनिल वीज यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. जय श्रीराम ही घोषणा ममता बॅनर्जी यांच्यासाठी उन्मत्त वळूला लाल कापड दाखवण्यासारखी आहे, म्हणूनच त्यांनी व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये आपले भाषण थांबवले, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

तत्पूर्वी, योगी सरकारचे मंत्री मोहसीन रझा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, ममता बॅनर्जी यांना आता रामनामही अवमान वाटतो. श्रीराम आपल्या संस्कृतीची आत्मा आहेत. ‘जय श्रीराम’, ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’ ऐकून ममताजींना जर एवढा अपमान वाटत असेल तर तिथल्या लोकांना ममतांच्या या मानसिकतेमुळे किती वाटेल? बंगालची जनता ममतांना उत्तर देईल.नेमके काय झाले होते पराक्रम दिनाच्या कार्यक्रमात?

केंद्र सरकारतर्फे येथील व्हिकटोरिया मेमोरियलमध्ये आयोजित नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाषणासाठी उभ्या राहिल्या. परंतु काही कार्यकर्त्यांनी जय श्रीराम घोषणा दिली. त्यामुळे ममता बॅनर्जी नाराज झाल्या. त्यांनी चक्क भाषणास नकार दिला.

Minister Anil Vij Criticizes CM Mamata Banerjee On Jai Shri Ram

ममता म्हणाल्या, हा कार्यक्रम कोणत्या एका पक्षाचा नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याचा गौरव करण्याचा कार्यक्रम असून तो राजकीय नाही. त्यामुळे मी आले आहे. तुम्हाला मी बोलूच नये, असे वाटत असेल तर मी बोलणार नाही. एवढे बोलून त्यांनी जयहिंद हा नारा दिला आणि भाषण आटोपते घेतले.

Minister Anil Vij Criticizes CM Mamata Banerjee On Jai Shri Ram

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती