विशेष प्रतिनिधी
यांगूनः म्यानमारमधील जनतेच्या निदर्शनाची तमा न बाळगता लष्कराने आपली मनमानी तशीच सुरु ठेवली आहे. देशावरील पकड आणखी मजबूत करण्यासाठी लष्कराने नेत्यांची धरपकड सुरु केली आहे. लष्कराने आज देशातील लोकप्रिय नेत्या आँग सान स्यू की यांचे प्रमुख सहकारी विन हतैन यांना अटक केली.Military repression begins in Myanmar
७९ वर्षांचे हतैन हे स्यू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी (एनएलडी) पक्षातील वरिष्ठ नेते आहेत. अटक होण्यापूर्वी हतैन यांनी लष्करावर सडकून टीका केली होती. लष्कराचे सत्ता उलथून टाकण्याचे कृत्य शहाणपणाचे नाही. लष्कराचे नेते देशाला चुकीच्या दिशेने नेत आहेत. लोकांनी उठावाविरुद्ध शक्य तेवढा आवाज उठवावा असे आवाहनही त्यांनी केली होती.
दरम्यान म्यानमारमधील लष्करी बंडाविरुद्ध जनतेत संताप उसळला आहे. राजधानीत सलग तिसऱ्या रात्री नागरिकांनी एकत्र येऊन थाळीनाद केला तसेच वाहनांचे हॉर्न वाजवून संताप व्यक्त केला.