औरंगाबादच्या छावणीमध्ये ‘स्वर्णिम विजय मशाल ’ दाखल लष्करी अधिकाऱ्यांकडून भव्य स्वागत


  • भारत आणि पाकिस्तानमध्ये 1971 मध्ये झालेले युद्ध जिंकायला 16 डिसेंबर रोजी 50 वर्षे पूर्ण झाली . या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी नवी दिल्ली येथील नॅशनल वॉर मेमोरियल (NWM) वर सुवर्ण विजय मशाल पेटवली . त्यांचे नेतृत्व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपिन रावत आणि सैन्याच्या तीनही शाखांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. सर्वांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली होती.
  • पंतप्रधानांनी यानिमित्त राष्ट्रीय स्मारकावरील अखंड तेवत असलेल्या ज्योतीमधून चार विजय मशाली प्रज्वलित करून त्या देशाच्या विविध भागांत पाठवल्या होत्या.

विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : 16 डिसेंबरपासून संपूर्ण देशात भारत- पाकिस्तान युद्धाचे सुवर्णजयंती वर्ष ज्याला ‘स्वर्णीम विजय वर्ष’संबोधले जातेय ते साजरे करण्यात येत आहे. पंतप्रधानांनी यानिमित्त राष्ट्रीय स्मारकावरील अखंड तेवत असलेल्या ज्योतीमधून चार विजय मशाली प्रज्वलित करून त्या देशाच्या विविध भागांत पाठवल्या होत्या.military officers who entered the ‘Golden Victory Torch’ at the Aurangabad camp
1971 साली डिसेंबर महिन्यात भारतीय संरक्षण दलांनी पाकिस्तानी लष्करावर एक निर्णायक आणि ऐतिहासिक विजय मिळवला, ज्यामुळे एका नव्या देशाची- बांग्लादेशची निर्मिती झाली आणि त्याचबरोबर दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वात मोठ्या लष्करी शरणागतीची देखील नोंद झाली.औरंगाबादेत आज त्यातील एका स्वर्णिम विजय मशालीचे आगमन झाले.

अग्निबाज डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल अनुप जाखड व औरंगाबाद छावणीच्या इतर अधिकाऱ्यांद्वारे या स्वर्णिम विजय मशालीचे भव्य व भावपूर्ण स्वागत आज छावणीत करण्यात आले. यावेळी 1971च्या युद्धातील वीर आणि वीर पत्नी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच महावीर चक्र विजेते मेजर जनरल अनंत नातू यांच्या निवासस्थानी मशाल नेण्यात आली.

पंतप्रधानांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्वाळांनी चार विजय मशाली पेटवल्या. या मशाली देशाच्या विविध भागात नेल्या जात आहेत . या मशाल 1971 च्या भारत-पाक युद्धाच्या परमवीर चक्र आणि महावीर चक्र विजेत्यांच्या गावातही पोहोचतील. राष्ट्रीय युद्ध स्मारक तयार करताना, या सर्व शौर्य पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या गावांची माती आणली गेली होती.

1971 चे भारत-पाक युद्ध

1971 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचे मुख्य कारण बांग्लादेशला मुक्त करणे हा होता. या युद्धात भारतीय सैन्यानेही भाग घेतला होता. 13 दिवस चाललेल्या या लढाईत पाक सैन्याला पराभवाचा सामना करावा लागला. 16 डिसेंबर 1971 रोजी, पाकिस्तानी जनरल एएके नियाझी यांनी आपल्या 90 हजार सैनिकांसह ढाका येथे मुक्ति वाहिनीसमोर आत्मसमर्पण केले. यासह बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळा झाला होता.

military officers who entered the ‘Golden Victory Torch’ at the Aurangabad camp

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती