जॅकसनचा कार्यक्रम 24 वर्षानंतर करमुक्त, ठाकरे- पवार सरकारचा निर्णय; साडेतीन कोटी रुपये परत करणार

मायकल जॅकसन संगीत रजनी हा कार्यक्रम मनोरंजन करातून मुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने तब्बल 24 वर्षानंतर घेतला आहे. राज्यात शिवसनेची सत्ता असताना 1996 मध्ये हा कार्यक्रम धुमधडाक्यात आयोजित केला होता. michael jackson’s program tax-free after 24 years, decision of Thackeray-Pawar government


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मायकल जॅकसन संगीत रजनी हा कार्यक्रम मनोरंजन करातून मुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने तब्बल 24 वर्षानंतर घेतला आहे. राज्यात शिवसनेची सत्ता असताना 1996 मध्ये हा कार्यक्रम धुमधडाक्यात आयोजित केला होता. सध्याचे मनसेचे अध्यक्ष आणि पूर्वीचे शिव उद्योग सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते.‘शास्त्रीय’ या कॅटेगरीत बसवून सरकारने मायकल जॅकसनच्या ब्रेक डान्सला मनोरंजन करातून सूट दिली होती. तसेच चॅरिटीसाठी शो करत असल्याचे सांगितले होते. परंतु विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला होता. तसेच शिव उद्योग सेना धर्मदाय संस्था नाही, असा सवाल उपस्थित केला होता.

अनेक वर्ष हे प्रकरण सरकारकडे पडून होते. 1996 ते 13 एप्रिल 2011 रोजी कोणताही निर्णय घेतला नाही म्हणून सरकारला न्यायालयाने जाब विचारला होता. या बाबत ग्राहक पंचायतीने आवाज उठविला होता.

michael jackson’s program tax-free after 24 years, decision of Thackeray-Pawar government

मनोरंजन करात सूट दिली खरी. परंतु तिकिटातून मिळालेलले साडेतीन कोटी न्यायालयाच्या कोषागारात पडून असून ही रक्कम कार्यक्रमाचे व्यवस्थापक विझक्राफ्ट इंटरनॅशनल यांना परत मिळणार आहेत. कराचा मुद्दा निर्माण झाल्यावर तिकिटांची रक्कम कोषागारात जमा करण्याचे आदेश दिले होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*