गाझीपूर बॉर्डरवर शेतकरी आंदोलनात पॉर्न स्टार मिया खलिफा! ट्विटरवर जोरदार ट्रेंड

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – इंटरनॅशनल म्युझिकल बस्टर रिहाना आणि पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांनी भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसून शेतकरी आंदोलनावर ट्विट करताच भारतात त्यांचा निषेध सुरू झाला.mia khalifa reached Ghazipur border with their family as Canada handlers asked all to protest

सरकारी पातळीवर देखील या सेलिब्रिटींना खणखणीत भाषेत प्रत्युत्तर देण्यात आले. पण त्याचवेळी नेटकऱ्यांनी आपापल्या अभिनव पध्दतीने या सेलिब्रिटींची खिल्ली उडवायलाही सुरूवात केली आहे.नुसत्या या सेलिब्रिटींनीच नाही, तर पॉर्न स्टार मिया खलिफा देखील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर बॉर्डरवर पोचल्याचे मिम्स नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. ते सध्या ट्विटरवर जोरदार ट्रेंड होत आहेत.

रिहाना आणि थनबर्न यांनी शेतकरी आंदोलनाचे ट्विट करताना भारतीय सरकार त्यांच्याशी चर्चा का करीत नाही, असा शहाजोगपणे प्रश्न उपस्थित केला होता. या सेलिब्रिटींनी हा विषय उचलून धरल्याने भारत सरकार जणू शेतकऱ्यांवर किती अन्याय करते आहे, असा नॅरेटिव्ह तयार होत होता. पण भारताच्या परराष्ट्र खात्याने या सेलिब्रिटींचा चांगलाच समाचार घेऊन त्यांना भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसू नये, असे सुनावले.

नेटकऱ्यांनी त्यांच्या पुढे जाऊन मिया खलिफा या पॉर्न स्टारला त्यांच्या बरोबर जोडून मिम तयार करून व्हायरल केले. या सगळ्यांना गरीब भारतीय वेशात सादर करून त्यांची पुरती खिल्ली उडविली आहे.

मिया खलिफा गाझीपूर बॉर्डरवर पोचली आहे. ती टिकैतना भेटली आहे. तिचे शेड्यूल बिझी आहे. ती कंगनाबरोबर चाय पे चर्चा टीव्ही डिबेटमध्ये भाग घेईल. ती बिग बॉस शोमध्ये सामील होईल, अशी खिल्ली उडविण्यात आली आहे.

mia khalifa reached Ghazipur border with their family as Canada handlers asked all to protest

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*