शिवसेनेचे अर्थपूर्ण फिक्सींग आणि अमित देशमुख, विश्वजित कदम यांच्या विक्रमी मताधिक्याची पोलखोल


विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान शिवसेनेने अनेक जागांवर फिक्सींग केले. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांशी अर्थपूर्ण व्यवहारानांतर फिक्सींग करून दुबळे उमेदवार दिले. याचे आरोप मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर होत आहेत. खुद्द भाजपाचे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी या संदर्भात खुलासा केला आहे. यामुळे अमित देशमुख आणि विश्वजित कदम यांच्या विक्रमी मताधिक्याची पोलखोल झाली आहे.


विशेष प्रतिनिधी

लातूर : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने अनेक जागांवर फिक्सींग केले. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांशी अर्थपूर्ण व्यवहारानंतर फिक्सींग करून दुबळे उमेदवार दिले. शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाल्याबद्दलचे आरोप मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले गेले. या संदर्भात भाजपाचे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी खुलासा केला आहे. यामुळे अमित देशमुख आणि विश्वजित कदम यांच्या विक्रमी मताधिक्याची पोलखोल झाली आहे. Meaningful fixing of Shiv Sena and poll of Amit Deshmukh and Vishwajit Kadam

लातूर ग्रामीण मतदारसंघात अमित देशमुख आणि पलूस-कडेगाव मतदारसंघात विश्वजित कदम यांना विक्रमी मताधिक्य मिळाले होते. विशेष म्हणजे हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेने भाजपाकडून भांडून घेतले होते. या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला नोटापेक्षाही कमी मते मिळाली होती.

विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान शिवसेनेने अनेक जागांवर फिक्सींग केले. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांशी अर्थपूर्ण व्यवहारानांतर फिक्सींग करून दुबळे उमेदवार दिले. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेला सोडण्यात आलेली जागा मुंबई शहरातील जागेच्या बदल्यात ‘फिक्सींग’ झाली होती, असा आरोप माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. या जागेवर शिवसेनेच्या उमेदवाराला नोटापेक्षाही अर्धी मते कमी मिळाली होती.

लातूर ग्रामीणची जागा अमित देशमुख यांना देवून देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीचा खून केला. ही जागा भाजपकडे होती. ऐनवेळी ही जागा सेनेला सुटली. या जागेसाठी सेनेने दिलेला उमेदवार प्रचाराला फिरकला देखील नाही. हे राजकारणातले सेटींग आहे. अमित देशमुख यांचे बंधू धीरज देशमुख यांनी ही जागा लढवली आणि विजयी झाले. मात्र, हा विजय कमालीचा एकतर्फी होता. फडणवीसांनी लातूर ग्रामीणची भाजपची विनिंग सीट शिवसेनेला सोडून धीरज देशमुख यांना आमदार केलं. हे राजकारणातली सर्वात मोठे फिक्सिंग असल्याचा गंभीर आरोप निलंगेकर यांनी केला आहे.

ज्या लोकांनी त्यावेळेस दावा केला की आम्ही घरी बसून विजयी झालो त्यांनी लोकशाहीचा खुन केला. लातूर जिल्ह्यातील सातच्या सात जागा मी निवडून आणला असत्या. देवेंद्र यांच्या या गोष्टींना विरोध करणारा मी एकमेव आमदार होतो, पुढेही मी हेच करणार असल्याचा निर्धार निलंगेकर यांनी व्यक्त केला. त्या जागेवर नोटाला सर्वात जास्त मतदान झाले असून मुंबईतल्या एका जागेसाठी हे फिक्सींग केलं असल्याचा आरोपही त्यांनी केला.

लातूर ग्रामीण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख याचे चिरंजीव धीरज देशमुख विजयी झाले आहे. त्यांची लढत नेमकी कोणाशी होती हे मात्र मतदानाच्या आकडेवरुन स्पष्ट होत नाही. कारण धीरज देशमुख यांच्यानंतर नोटाला मतदारांनी सर्वाधिक मतदान केलं आहे. मतदारांनी तब्बल 26 हजार 899 मतं याठिकाणी नोटाला दिली आहेत. लातूर ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसच्या धीरज देशमुख 1 लाख 31 हजार 321 मतांनी विजयी झाले. त्यांनंतर नोटाला 26 हजार 899 मतं मिळाली.

त्यानंतर शिवसेनेच्या सचिन देशमुख यांना 13 हजार 113 मतं मिळाली तर वंचितचे उमेदवार बळीराम डोने यांना येथे 12 हजार 670 मतं मिळाली. मात्र याठिकाणी नोटाला एवढी मतं मतदारांनी का दिली? याबाबत विचार करणे गरजेचं आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान शिवसेनेने भाजपावर अनेक जागांवर दबाव आणला होता. त्यामुळे युती टिकविण्यासाठी भाजपाला काही जागा सोडाव्या लागल्या. शिवसेनेने काही जागा भाजपाकडून भांडून घेतल्या. मात्र, या जागांवर तुल्यबळ उमेदवार उभे केले नाहीत. शिवसेनेच्या उमेदवारांना मतदारसंघात प्रचार करण्यापासूनही रोखले होते. केवळ लातूर ग्रामीण मतदारसंघातच नव्हे तर पलूस-कडेगाव मतदारसंघातही हेच झाले.

या मतदारसंघात भाजपाकडून संग्राम देशमुख अनेक वर्षांपासून तयारी करत होते. त्यांचे चुलते संपतराव देशमुख यांनी पतंगराव कदम यांनाही पराभवाचा धक्का दिला होता. परंतु, शिवसेनेने या जागेसाठीही फिक्सिंग करत भाजपाकडून भांडून मागून घेतला. शिवसेनेकडून संजय विभूते यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, उमेदवारच प्रचारातून गायब होते. त्यामुळे विभूते यांना केवळ आठ हजार ९७६ मते मिळाली. त्यांच्यापेक्षा जास्त मते नोटाला मिळाली.

Meaningful fixing of Shiv Sena and poll of Amit Deshmukh and Vishwajit Kadam

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था