सोनियांबरोबर मायावतींनाही भारतरत्न द्यावे; काँग्रेस नेते हरिश रावतांनी आणली दोन महिला नेत्यांची नावे राजकीय रणांगणात

सोनिया गांधी आणि बहुजन समाज पार्टीच्या अध्या मायावती यांना भारतरत्नने सन्मानित करायला हवं, असे ट्विट हरिश रावत यांनी केले आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतरत्न किताबावरून काँग्रेसने आपली रणनीती थोडी बदलून काँग्रेसच्या नेत्यांबरोबरच दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांची नावेही किताबासाठी शिफारशीत आणायला सुरवात केली आहे. उत्तराखंडाचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे, त्याच बरोबर त्यांनी मायावतींच्या नावाचीही शिफारस भारतरत्नसाठी करून काँग्रेसच्या बदलत्या धोरणाचा आगाज करवून दिला आहे. Mayawati should be given Bharat Ratna along with Sonia gandhi; Congress leader Harish Rawat

सोनिया गांधी आणि बहुजन समाज पार्टीच्या अध्या मायावती यांना भारतरत्नने सन्मानित करायला हवं, असे ट्विट हरिश रावत यांनी केले आहे. काँग्रेस पक्ष एकाच परिवारातील नेत्यांना भारतरत्न देतो, अशी टीका होत असते, या टीकेपासून बचावासाठी रावत यांनी सोनियांबरोबर मायावती यांच्या नावाची शिफारसही केली आहे.रावत म्हणाले, “सोनिया गांधी आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती या दोघीही हुशार आणि प्रखर महिला राजकारणी आहेत. तुम्ही त्यांच्या राजकारणाशी सहमत असाला किंवा नसाल. मात्र, सोनिया गांधी यांनी भारतीय महिलांचा सन्मान आणि लोकसेवेच्या मापदंडांना एक नवी उंची प्राप्त करुन दिल्याचे कोणीही नाकारू शकत नाही. त्यांना भारतीय महिलांचे गौरवशाली स्वरुप मानले जाते. त्याचबरोबर मायावती यांनी अनेक वर्षांपासून पीडित-शोषित लोकांच्या मनात एक अद्भुत विश्वास जागृत केला आहे. त्यामुळे भारत सरकारने या दोन्ही व्यक्तीमत्वांचा या वर्षीचा भारतरत्न देऊन सन्मान करावा” रावत यांनी ट्विटरवर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केले आहे.

Mayawati should be given Bharat Ratna along with Sonia gandhi; Congress leader Harish Rawat

मोदी सरकारने २०१९ मध्ये नानाजी देशमुख, भुपेंद्र हजारिका या दोघांना मरणोत्तर भारतरत्न तर दिवंगत प्रणब मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*