इंधन दरवाढीने अखिलेश, मायावतींचा टिवटिवाट, बुवा – भतीजा जोडीचा भाजपवर हल्लाबोल


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी आज भाजप सरकारवर महागाईवरुन हल्लाबोल केला आहे. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुवा – भतीजा जोडीने ट्विटचा टिवटिवाट करीत भाजपवर वार करण्याच्या प्रयत्न केला आहे. Mayawati Akhilesh Yadav lashes On BJP on petrol price hike

मायावती यांनी ट्विट करत म्हटले की, देशात पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस यासारख्या अत्यावश्य क वस्तूंच्या किमतीत अनावश्य क वाढ करण्यात आली आहे. कोरोना संसर्ग, बेरोजगारी आणि महागाईने ग्रासलेल्या जनतेचा छळ करणे हे सर्वार्थाने चुकीचे आहे. जीवघेणी भाववाढ कन जनकल्याणासाठी निधी जमवणे चुकीचे आहे.अखिलेश यादव यांनी हिंदीतून ट्विट करत सामान्यांचे विविध कारणांमुळे उत्पन्न घटत आहे, वेतन कपात होत असल्याने जगायचे कसे, असा सवाल केला आहे. अखिलेश यादव यांनी ट्विटरवर एक कार्टून शेअर केले आहे.

त्यात विकास नावाच्या स्कूटर चालवण्यासाठी सर्वसामान्यांना पिरगळले जात असून त्याचा घाम इंधनाच्या टाकीत पडत असल्याचे या कार्टूनमध्ये दिसत आहे.

Mayawati Akhilesh Yadav lashes On BJP on petrol price hike

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी