मतभेद मिटता मिटता पुन्हा उफाळले; राज्यपाल नियुक्त १२ जागांचे प्रस्ताव लांबणीवर

  • शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी चार उमेदवारांचे प्रस्ताव; परंतु ऐनवेळी प्रस्ताव न आणण्याचा सरकारचा निरोप

वृत्तसंस्था

मुंबई : विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडी सरकारच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. परंतु, हा प्रस्ताव तुर्तास पुढे ढकलण्यात आला आहे. महाआघाडीतील तिनी पक्षांचे या विषयावरील मतभेद मिटता मिटता उफाळून आल्याचे सांगण्यात येते. काही विशिष्ट नावांवरून हे सध्याचे मित्र पक्ष एकमेकांवर आक्षेप घेत असल्याची माहिती पुढे येत आहे.

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव आणण्याची आघाडी सरकारची तयारी होती. यासंदर्भात  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची काल बैठक देखील झाली होती. मात्र ऐनवेळी प्रस्ताव न आणण्याचा निर्णय सरकारने घेतला.

राज्यपाल नियुक्त १२ नावांना मंत्रिमंडळाची मंजुरी देऊन ती नावं मंजूरीसाठी राज्यपालांकडे पाठवली जाणार आहेत. महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यात झालेल्या संघर्षानंतर राज्यपाल या नावांना पसंती देणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांचे नाव असणार का ? याबाबत देखील राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु आहे. मात्र अद्याप खडसेंचं नाव निश्चित झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. अंतिम क्षणी खडसेंचे नाव येणार का? हे पाहणे औत्सूक्याचे ठरणार आहे.

खडसेंनी शिवसेनेबरोबर ची भाजपची युती तोडण्यात पुढाकार घेतला होता याचे नुकसान शिवसेनेला सोसावे लागले होते या पार्श्वभूमीवर खडसेंची उमेदवारी स्वरूपात राष्ट्रवादीने स्वीकार राष्ट्रवादीने मांडली तरी शिवसेना हा प्रस्ताव स्वीकारेल का? याविषयी शंका व्यक्त केली जात आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*