Massive blast at a chemical factory in Gujarat; 24 injured, sound heard up to 10 km

गुजरातेत केमिकल कारखान्यात प्रचंड स्फोट; 24 जण जखमी, 10 किमीपर्यंत ऐकू आला आवाज

मंगळवारी सकाळी गुजरातमधील भरूच जिल्ह्यात एका केमिकल कारखान्यात आग लागून प्रचंड स्फोट झाला. या दुर्घटनेत 24 जण जखमी झाले आहेत. झगडियातील यूपीएल -5 या रासायनिक कंपनीच्या प्लांटमध्ये मंगळवारी पहाटे दोन वाजता ही दुर्घटना घडल्याचे विविध माध्यमांनी सांगितले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. Massive blast at a chemical factory in Gujarat; 24 injured, sound heard up to 10 km


विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद : मंगळवारी सकाळी गुजरातमधील भरूच जिल्ह्यात एका केमिकल कारखान्यात आग लागून प्रचंड स्फोट झाला. या दुर्घटनेत 24 जण जखमी झाले आहेत. झगडियातील यूपीएल -5 या रासायनिक कंपनीच्या प्लांटमध्ये मंगळवारी पहाटे दोन वाजता ही दुर्घटना घडल्याचे विविध माध्यमांनी सांगितले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या मते, स्फोट एवढा मोठा होता की त्याचा आवाज दहा किलोमीटर अंतरावरही ऐकण्यात आला. स्फोटामुळे स्थानिकांनी धरणीकंपही अनुभवला. यानंतर लोक घराबाहेर पडले. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.या अपघातात तब्बल 24 कामगार जखमी झाले आहेत. या सर्वांना भरूच आणि वडोदरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोट व आगीमुळे धुराचे प्रचंड लोट दिसत होते.

Massive blast at a chemical factory in Gujarat; 24 injured, sound heard up to 10 km

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*