शेतकरी आंदोलनात सापडलेल्या ‘शूटर’ची पोलखोल, म्हणाला – ‘मला पत्रकारांसमोर बळजबरीने स्क्रिप्ट वाचायला लावली’

masked Man Yogesh Arrested By Police At Farmers Protest Singhu Border Says I was Beaten and forced to read Script in front of journalists

सिंघू बॉर्डरवर शेतकरी नेत्यांवर गोळ्या झाडण्याचा कट रचणाच्या आरोपाखाली ज्या ‘शूटर’ला अटक झाली होती, त्याची पोलखोल झाली आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शूटरने कबूल केले की, तो कोणाचीही हत्या करण्यासाठी आला नव्हता, तर त्याच्याकडून हे सर्व वदवून घेण्यात आले. बळजबरीने त्याला आधीच लिहून ठेवलेली स्क्रिप्ट पत्रकारांसमोर वाचायला भाग पाडण्यात आले.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सिंघू बॉर्डरवर शेतकरी नेत्यांवर गोळ्या झाडण्याचा कट रचणाच्या आरोपाखाली ज्या ‘शूटर’ला अटक झाली होती, त्याची पोलखोल झाली आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शूटरने कबूल केले की, तो कोणाचीही हत्या करण्यासाठी आला नव्हता, तर त्याच्याकडून हे सर्व वदवून घेण्यात आले. बळजबरीने त्याला आधीच लिहून ठेवलेली स्क्रिप्ट पत्रकारांसमोर वाचायला भाग पाडण्यात आले. तरुणाच्या या खुलाशामुळे मोठी खळबळ उडाली आहे. masked Man Yogesh Arrested By Police At Farmers Protest Singhu Border Says I was Beaten and forced to read Script in front of journalists

केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्याच्या निषेधार्थ आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांना आता 59 दिवस झाले आहेत. हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकून आहेत. दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी चळवळीला अडथळा आणण्याचे मोठे षडयंत्र समोर आले आहे. शुक्रवारी रात्री सिंघू बॉर्डरवर आंदोलनस्थळी एका संशयिताला अटक करण्यात आली. आंदोलन विस्कळीत करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. शुक्रवारी पकडलेल्या या तथाकथित शूटरला पकडून शेतकरी नेत्यांनी माध्यमांसमोर नेले. चेहरा झाकलेल्या अवस्थेत या संशयित तरुणाने माध्यमांसमोर शेतकरी नेत्यांच्या हत्येचे खळबजनक खुलासे केले होते.सिंघू बॉर्डरवर पकडल्या गेलेल्या संशयिताचे नाव योगेश असून तो हरियाणाच्या सोनीपत येथील रहिवासी आहे. संशयितास पकडल्यानंतर शुक्रवारी रात्री शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेतही बनावट ‘शूटर’ योगेशही होता. यावेळी त्याने सांगितले की, त्याला आंदोलनातील चार मोठ्या शेतकरी नेत्यांवर गोळ्या झाडण्याचे सांगण्यात आले आहे.

masked Man Yogesh Arrested By Police At Farmers Protest Singhu Border Says I was Beaten and forced to read Script in front of journalists

सिंघू बॉर्डरवर अटक करण्यात आलेला योगेशने आपला हा जबाब आता पूर्णपणे उलटला आहे. योगेशने आता सांगितले की, त्याला आंदोलनस्थळी शेतकऱ्यांनी अपहरण करून आणले आणि खोटे विधान करण्यास भाग पाडले. योगेशने सांगितले की, तो एक स्वयंपाकी असून शुक्रवारी दिल्लीहून पानिपतला जात होता. यावेळी काही जणांनी त्याला पकडून जबर मारहाण केली आणि नंतर पत्रकारांसमोर कटाची माहिती देण्यास सांगितले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती