म्यानमारमध्ये लष्कराकडून हिंसक कारवाई सुरुच, यांगूनमध्ये मार्शल लॉ लागू

वृत्तसंस्था

यांगून : म्यानमारमध्ये जनतेचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी लष्कराकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. आता देशातील सर्वांत मोठे शहर असलेल्या यांगूनमध्ये आंदोलनाचा जोर वाढल्यानंतर मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे. Martial Law in Myanmar

लष्कराने काल केलेल्या गोळीबारात ३८ आंदोलकांचा मृत्यू झाल्यानंतर येथे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मार्शल लॉ लागू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.लोकशाहीवादी नेत्यांनी लढा तीव्र करण्याचे आवाहन केले असले तरी, आणि आंदोलकही तितक्याच निर्धाराने लोकशाही मिळविण्यासाठी झगडत असले तरी हिंसा वाढत असल्याने जगभरातून चिंता व्यक्त होत आहे. लष्करी राजवटीने अनेक भागांमधील मोबाईल इंटरनेट सेवा बंद केली आहे. माध्यमांवरही अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. इंटरनेट सेवाच बंद केल्याने लोकशाहीवादी नेत्या आँग सान स्यू की यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात होणारी सुनावणीही रद्द करावी लागली आहे.

म्यानमारमध्ये एक फेब्रुवारीला लष्कराने बंड करत लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारच्या हातून सत्ता हिसकावून घेतली. यानंतर देशात आणीबाणी लागू असून अनेक नेते अटकेत आहेत. आंदोलकांवर थेट गोळीबार केला जात आहे.

Martial Law in Myanmar

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*