मराठी साहित्य संमेलन दिल्लीत नाही; पवारांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाचा साहित्यिक योग नाशिकमध्येच साधणार

आगामी ९४ वे मराठी साहित्य संमेलन दिल्लीत नव्हे, तर नाशिकलाच होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी शुक्रवारी औरंगाबादेत पत्रकार परिषदेत केली. Marathi Sahitya Sammelan in nashik


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आगामी ९४ वे मराठी साहित्य संमेलन दिल्लीत नव्हे, तर नाशिकलाच होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी शुक्रवारी औरंगाबादेत पत्रकार परिषदेत केली. हे संमेलन २०२०-२१च्या मार्च महिन्याच्या अखेरीस होईल. संमेलनाच्या तारखा निश्चित झाल्यानंतर त्या जाहीर करण्यात येणार आहेत. या साहित्य संमेलनादरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याची चर्चाही सुरू झाली आहे. आता हा योग दिल्लीत नव्हे, तर नाशिकमध्ये साधला जाणार आहे.

९४ व्या साहित्य संमेलनासाठी नाशिकची दोन, सेलूचे एक, पुण्याचे एक आणि अंमळनेरवरून एक अशी निमंत्रणे आली होती. पुण्याच्या सरहद संस्थेने फेर निमंत्रण पाठवले होते, यामध्ये मे महिन्यांत दिल्लीत साहित्य संमेलन घेण्याची मागणी केली होती. संपूर्ण प्रक्रियेनंतर अंतिमतः नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारत ९४ व्या साहित्य संमेलनासाठी निवड करण्यात आली.शरद पवारांचा ८० वाढदिवस म्हणजे सहस्त्रचंद्र दर्शनाच्या योगायोगाची चर्चा संमेलनाचे ठिकाण ठरत असतानाच सुरू झाली. त्यावर मराठी वाहिन्यांच्या प्राइम टाइममध्ये चर्चाही झाल्या. राष्ट्रवादीचे नेते हेमंत टकले यांनी हा खरेच योगायोग असल्याचे म्हटले. त्याचवेळी दिल्लीतही साहित्य संमेलन घेण्याची चर्चा पुढे येत होती. दिल्लीकरांनी संमेलनासाठी आग्रह धरला होता. पण अखेरीस महामंडळाने दिल्ली नव्हे, तर नाशिकचे ठिकाण साहित्य संमेलनासाठी निवडले. त्यामुळे साहित्य संमेलनाबरोबर शरद पवारांच्या सहस्त्रचंद्र सोहळ्याचा साहित्यिक योग दिल्लीत नव्हे, तर नाशिकमध्ये साजरा होणार आहे.

Marathi Sahitya Sammelan in nashik

पवारांचा साहित्यिक योग
पवारांचा अनेक साहित्यिकांशी फार जवळचा संबंध आला आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी जे दिल्लीतल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, त्यांच्यापासून कुसुमाग्रज, ना. धो. महानोर, मधू मंगेश कर्णिक अशा अनेक साहित्यिकांशी त्यांचे मधूर संबंध राहिले आहेत. पवारांचे आत्मचरित्रही साहित्यिक वर्तुळात गाजले. अनेक साहित्यिकांनी त्यावर परीक्षणे लिहिली. अनेक साहित्यिकांनी पवारांच्या विविध वेळी प्रकाशित करण्यात आलेल्या गौरव ग्रंथांचे संपादनही केले आहे. सुमारे सात ते आठ साहित्य संमेलनांच्या उदघाटनाचा मान त्यांना मिळालेला आहे. अनेक साहित्यिक व्यासपीठांवर त्यांचा दमदार वावरही राहिला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*