मराठा आरक्षणासंदर्भात ज्येष्ठ राजकीय नेतृत्वाने काय केले? उदयनराजे यांचा शरद पवार यांना सवाल


मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बोलायला मी वयाने अत्यंत लहान आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाचे अनेक ज्येष्ठ व वडीलधारी राजकीय मंडळी आहेत. गेल्या तीन दशकात मराठा आरक्षणाच्या संदर्भात या ज्येष्ठ राजकीय नेतृत्वाने काय केले? असा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे, अशा असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे नेते उदयनराजे यांनी शरद पवार यांना केला आहे.maratha reservation news


विशेष प्रतिनिधी

सातारा : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बोलायला मी वयाने अत्यंत लहान आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाचे अनेक ज्येष्ठ व वडीलधारी राजकीय मंडळी आहेत. गेल्या तीन दशकात मराठा आरक्षणाच्या संदर्भात या ज्येष्ठ राजकीय नेतृत्वाने काय केले? असा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे, अशा असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे नेते उदयन राजे यांनी शरद पवार यांना केला आहेmaratha reservation news

मराठा आरक्षणात वारंवार राजकारण होत असल्याची टीका करताना उदयनराजे यांनी शरद पवार यांचा नामोल्लेख न करता त्यांना प्रश्न केले आहेत.

ते म्हणाले,  मराठा आरक्षणाच्या संदर्भात वारंवार राजकारण होत असल्याने हे आरक्षण मिळेनासे झाले आहे. योग्य वेळ आल्यावर या विषयावर मी बोलणारच आहे. पण महाराष्ट्रात माझ्यापेक्षा राजकारणात वडीलधारी मंडळी आहेत. गेल्या ३० वर्षात त्यांनी या विषयावर का आवाज उठविला नाही, हा आमच्या सारख्यांचा प्रश्न आहे.


उदयनराजे म्हणाले,  मराठा आरक्षणावर योग्य भूमिका घेतली गेली नाही तर उद्रेक होईल. लहानपणीचे मित्र आरक्षणामुळे एकमेकांकडे संशयाने पहात आहेत. मराठा आरक्षण या विषयावर उगाच अहंभाव बाळगणाऱ्यांच्या वाऱ्याला  सुद्धा मी उभा राहणार नाही. मात्र ही माझी वैयक्तिक मते आहेत. माझ्या मतांवर अनेक मतांतरे होणार हे मला ठाऊक आहे. मी जे बोलतो ते आंतरिक तळमळीने बोलतो.

maratha reservation news

जात पात लोकांनी स्वत:च्या सोयीसाठी निर्माण केली. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभारताना कधी जातीचा विचार केला नाही, असे सांगून उदयनराजे म्हणाले,  १९८९ साली तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी अंमलात आणल्या मग त्याचवेळी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय का पुढे आला नाही? मराठा आरक्षणात राजकारण केले जात असल्याने प्रत्यक्षात ते लागू होण्यासंदर्भात प्रचंड अडचणी येत आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती